Corona
Corona Team Esakal
पुणे

उरुळी कांचन-लोणी काळभोरमध्ये एका दिवसात 150 हून अधिक कोरोना रुग्ण

जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीत कोरोनाचा मागील आठ दिवसापासून धुडगूस सुरुच आहे. गुरुवारी (ता. १५) एका दिवसात कोरोनाचे तब्बल दिडशेहून अधिक रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून विकेंड लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदीसह अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत मात्र, नागरीक विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित राजरोसपणे फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच लोणी काळभोर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरु न केल्याने, पुर्व हवेलीत कोरोनाचा फार मोठा विस्फोठ होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुर्व हवेलीत लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बुधवारी (ता. १४ ) दिवसभरात तीनशेहुन अधिकजणांचे स्वॅब घेण्यात आले होते. या स्वॅब तपासनीचा अहवाल गुरुवारी मिळाला असुन, तीनशेपैकी दिडशेहुन अधिक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. यात तिन्ही मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत रुग्णाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. मागील दहा दिवसाच्या कालावधीत काही नामांकित नागरीकांच्यासह पन्नासहून अधिक जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

कोरोनावरील लस व स्वॅब चाचणीचे किटचा तुटवडा....

उरुळी कांचन, लोणी काळभोर व कुंजीरवाडी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरीकांना लसीकरणाचे काम चालू आहे. मात्र मागील आठ दिवसांपासूनवरील तीन लसीकरण केंद्रात लस पुरेसी उपलब्ध होत नसल्याने, नागरीकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. तर दुसरीकडे लोणी काळभोर येथील स्वॅब तपासणी केंद्रात स्वॅब चाचणीसाठी लागणारे किट पुरेसे मिळत नसल्याने, नागरीकांना कोरोचा चाचणी वणवण फिरावे लागत आहे.

लॉकडाऊनच्या नियमांची ऐसी की तैशी

याबाबत बोलतांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरीष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. डि. के. जाधव म्हणाले, ''राज्यभऱात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, राज्य शासनाने विकेंड लॉक डाऊन, संचारबंदी, जमावबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. पुर्व हवेलीतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन करण्यासाठी वारंवार सूचना देत आहेत. मात्र वाहन-चालक, भाजी-विक्रेते, दुकानदार आणि विनाकारण रस्त्यावरुण फिरणारे नागरिक बिनधास्तपणे मास्क न वापरताना दिसत आहेत. कोरोना कोण आहे? तो काय करतोय? तो आम्हाला होणारच नाही? अशा प्रकारच्या वागण्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. यावरून नागरिकांना कोरोनाच्या संदर्भातील गांभीर्य नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोणी काळभोर पोलिसांनी याबाबत कडक भुमिका घेतल्याशिवाय नागरीक ऐकणार नाहीत'' असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ठ केले.

लोणी काळभोर पोलिस अद्यापही बघ्याच्याच भुमिकेत..

लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीतील तीन मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा विस्फोट झालेला आहे. असे असतांनाही नागरीक मात्र विनामास्क व सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवित राजरोसपणे फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. व्यवसाय चालु करण्यास बंदी असतांनाही अनेक व्यावसायिक दुकाने उघडून बसल्याचे चित्र दिसत आहे. चौकाचौकात नागरीक गर्दी करुन फिरत असल्याचे दिसत असुनही, पोलिस यंत्रना मात्र कारवाई करत नाही.

डॉक्टर, नर्स भितीच्या सावटाखाली...

कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असताना, दुसरीकडे कोरोना मुक्तीसाठी आपणच कसे काम करतो हे दाखविण्यासाठी पुर्व हवेलीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामधील लोकप्रतिनिधी, लोकप्रतिनीधींचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते व कथित पत्रकारांच्याकडुन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैधकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स यांना दमबाजी व शिवीगाळ करण्याचे प्रमाण मागील कांही दिवसापासून वाढले आहे. महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीने, फोन न उचचल्याच्या कारणावरुन एका जेष्ठ वैदयकिय अधिकाऱ्याला दमबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे कोरोनामुक्तीसाठी काम करणारे डॉक्टर, नर्स भितीच्या सावटाखाली असल्याचे चित्र पुर्व हवेलीत आहे.

व्यवहार सकाळी सात ते दुपारी दोन या दरम्यानच...

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, पुर्व हवेलीमधील लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही ग्रामपंचायत प्रशासनाने आज (शुक्रवार) पासून येत्या ३० एप्रिल पर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अत्यावश्यक सेवेमधील दवाखाने आणि मेडिकल फक्त दिवसभर सुरू असे उरुळी कांचनचे सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन व लोणी काळभोरच्या उपसरपंच ज्योती अमित काळभोर यांनी जाहीर केले आहे.

ग्रामपंचायत निहाय अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या...

लोणी काळभोर (१३८), उरुळी कांचन (११५), मांजरी बुद्रुक (११४), कदमवाकवस्ती (११५), कुंजीरवाडी (४७), नायगाव (०९), आळंदी म्हातोबाची (२७), थेऊर (३५), सोरतापवाडी (४०), पेठ (०२), तरडे (०६), कोरेगाव मूळ (२६) भवरापूर (०३), खामगाव टेक (०३), शिंदवणे (२६), वळती (०५) व टिळेकरवाडी (०४).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT