corona positive  sakal
पुणे

पुणे : कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

कोरोनाच्या सक्रिय बाधित रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील कोरोनाच्या सक्रिय बाधित रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे ते घरीच विलगीकरणात आहेत. तर ७३ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी बुधवारी (ता. ५) दिली. (pune corona news update)

गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे डॉ. भारती यांनी सांगितले. तर कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) त्यांच्या चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. त्याचबरोबर नागरिकही स्वत:हून चाचणी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. लसीकरण न झालेल्यांचे लसीकरण त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्या एक लाख ९१ हजार नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण होणे बाकी आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT