पुणे

‘मोर्पेन’ची तिमाहीत विक्रमी कामगिरी

CD

‘मोर्पेन’ची तिमाहीत विक्रमी कामगिरी
गुरुग्राम, ता. ७ः मोर्पेन लॅबोरेटरीज लि.ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही महसूल आणि नफा नोंदवला आहे. कंपनीचा तिमाही महसूल ३४ टक्क्यांनी वाढून ५७५.३१ कोटी रुपयांवर पोहोचला, तर निव्वळ नफा ३९४ टक्क्यांनी वाढून ५६.३५ कोटी रुपयांवर पोहोचला. ईबीआयटीडीएमध्ये तब्बल २०७ टक्क्यांची वाढ होत तो ८७.७२ कोटी रुपये झाला आहे.

कंपनीच्या निर्यात महसुलात १११ टक्के वाढ झाली असून, एपीआय व्यवसायात ३१ टक्के, तर एपीआय निर्यातीत ४२ टक्के वाढ नोंदवण्यात आली. मेडिकल डिव्हाइसेस व्यवसायानेही १९ टक्के वाढ नोंदवली. कंपनीचा ८२५ कोटी रुपयांचा सीडीएमओ करार आता व्यावसायिक अंमलबजावणीच्या टप्प्यात दाखल झाला आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील सुरी म्हणाले, पहिल्या तिमाहीतील विक्रमी कामगिरी कंपनीच्या परिवर्तनाच्या प्रवासाला बळ देणारी आहे. एपीआय व्यवसायातील सुधारणा, निर्यातीत वाढ आणि सीडीएमओ क्षेत्रातील विस्तारामुळे कंपनीच्या आगामी वाढीच्या संधी अधिक मजबूत झाल्या आहेत. कंपनीने सलग चौथ्यांदा यूएसएफडीए तपासणी पूर्ण केली आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत उत्पादनक्षमता १,२०० केएलपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

सई ताम्हणकरला जेवणात आवडतो हा मराठमोळा पदार्थ; फक्त सांगलीकरच सांगू शकतील अस्सल चव; तुम्ही कधी ऐकलाय का?

Marathi News Live Updates : धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

Dombivli Politics: डोंबिवलीत कार्यकर्त्यांची 'घरवापसी'! भाजपात गेले, पस्तावले अन् पुन्हा मनसेत परतले, राजू पाटलांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT