मोर्वेत बाल आनंद मेळाव्यात मुलांनी लुटला आनंद
खंडाळा, ता. ७ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्वे (ता. खंडाळा) या ठिकाणी विविध आनंददायी उपक्रमाने अहिरे केंद्राचा बाल आनंद मेळावा उत्साहात झाला. प्रसंगी विविध मनोरंजनात्मक खेळातून मुलांनी मनमुराद आनंद लुटला.
या मेळाव्यातील विविध दालनाचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य संतोष वीर, अतुल पवार व वंदना धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच अंकुश पडळकर, शाळा समितीचे अध्यक्ष राहुल धायगुडे, मल्हारी जगताप, विस्तार अधिकारी ऊर्मिला पवार, केंद्रप्रमुख श्रीरंग जाधव, गोविंद धायगुडे, दादा काश्वेद, मुख्याध्यापक दीपाली जाधव, शिक्षक तुषार कांबळे, गणेश माळी, संगीता माळी, विषय शिक्षक वनिता घाडगे, तसेच परिसरातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान सुरुवातीला सर्व पदाधिकारी, इतर शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांचे सवाद्य स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यानुभव, रांगोळी व चेहरा रंगवणे असे दालन उभारण्यात आले होते. तर बटर खाणे, फुगे फोडणे असे फनी गेम्स् घेण्यात आले. या प्रसंगी मिकीमाऊस, आकर्षक रांगोळी व सेल्फी पॉइंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य संतोष साळुंखे, पंचायत समिती सदस्य यशवंत खुंटे, विस्ताराधिकारी हनुमंतराव धायगुडे, जिल्हा शिक्षक संघटना अध्यक्ष चंद्रकांत यादव, तालुका अध्यक्ष भानुदास राऊत व पालक यांनी भेट देऊन या आनंद मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. हा मेळावा करण्यासठी मोर्वे शाळा समितीचे अध्यक्ष राहुल धायगुडे, मुख्याध्यापक श्रीमती जाधव, दशरथ ननावरे, प्रभाकर सोळसकर, दत्तात्रय धायगुडे, सत्यवान माळी, ज्ञानेश्वर धायगुडे, राजेश्री पीठे, रोहिणी माळी, राजश्री कांबळे, स्वप्नाली शेडगे व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. गणेश माळी यांनी आभार मानले.
-----
मोर्वे ः बाल आनंद मेळाव्यासाठी आकर्षक ड्रेसकोड करून सहभागी झालेल्या शिक्षिका. यावेळी उपस्थित पदाधिकारी .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.