moshi mutilation due to hoarding 
पुणे

होर्डिंगमुळे मोशीचे विद्रुपीकरण 

सकाळवृत्तसेवा

मोशी : मोशी टोल नाका ते भोसरी दरम्यानच्या पुणे-नाशिक महामार्गावर होर्डिंग उभारले आहेत. यावरील फाटलेल्या बॅनर्सचे कपडे हवेत लोंबकळणे, त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होणे, बॅनर्सचे फाटके कापड रस्त्यावरच पडल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या होर्डिंगमळे मोशीच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग्ज पडले होते. दोन जणांचा बळी गेला होता. मोशी उपनगर हे शहराचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे मोशी ते नाशिक फाटा या दरम्यानच्या टोल नाका, भारत माता, मोशी, उपबाजार, राजा शिवछत्रपती, भोसरी, नाशिक फाटा आदी चौकांसह महामार्गावर जाहिरातींचे होर्डिंग्ज उभारले आहेत. हे होर्डिंग्ज तातडीने हटवावेत, अशी मागणी होत आहे. 

मोठ्या होर्डिंगमुळे शहराचे सौंदर्य नष्ट झाले आहे. प्रशासनाने आकाराचे बंधन घालून हॉकर्स झोनसारखा एक झोन निर्माण करावा. तेथेच होर्डिंग उभारण्यास परवानगी द्यावी. 
सुनील बोराटे, सामाजिक कार्यकर्ते 

वारकऱ्यांना देहू आणि आळंदीसाठी मोशीतूनच जावे लागते. मात्र, होर्डिंगमुळे तीर्थक्षेत्रांकडे जाणारे दिशादर्शक फलकही दिसत नाहीत. या दोन्ही तीर्थक्षेत्र मार्गावर कमानी उभाराव्यात. 
सोपान घोलप, सामाजिक कार्यकर्ते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT