पुणे

वेस्ट टू एनर्जीच्या ठेकेदाराला दररोज ५० हजारांचा दंड

CD

पिंपरी, ता. २ : मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प एक ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी महापालिकेने दिलेली मुदत संपूनही प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे कंत्राटदार ‘अँटोनी अँण्ड लारा वेस्ट’ कंपनीला महापालिकेने प्रतिदिन ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. दुर्घटनेपूर्वी कोसळलेल्या प्रकल्पाच्या चिमणीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे.

मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या परिसरात ८ जुलै २०२६ रोजी प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव डेपोतील कचरा प्रक्रिया आणि डंपिंग व्यवस्थेवर परिणाम झाला. परिणामी शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विविध भागांत कचरा साचल्याने नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंत्राटदार कंपनीला सप्टेंबरअखेर आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एक ऑक्टोबरपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, दुर्घटनेपूर्वीच कोसळलेल्या चिमणीची पुनर्उभारणी मुदतीत पूर्ण होऊ शकलेली नाही.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू झाल्यानंतर शहरातून दररोज संकलित होणाऱ्या सुमारे सातशे टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. मात्र, प्रकल्प बंद असल्याने कचऱ्याच्या प्रक्रियेवरही ताण कायम आहे. मुदत देऊनही प्रकल्प सुरू न झाल्याने प्रशासनाने आता आर्थिक दंडाची कारवाई सुरू केली आहे.

ठेकेदाराला सप्टेंबरअखेर प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित कंपनीवर दंडाची आकारणी सुरू करण्यात आली आहे.
- विनय ओहोळ, सहशहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT