Dr-Aparna-Vatave 
पुणे

Video : ‘कास’वरील शेवाळाला डॉ. वाटवे यांचे नाव

नीला शर्मा

पुणे - कास पठारावर आढळलेल्या एका दुर्मीळ शेवाळ प्रजातीला पुण्यातील डॉ. अपर्णा वाटवे यांचे नाव देण्यात आले आहे. वनस्पतिशास्त्रातील अभ्यास, संशोधन आणि योगदानाबद्घल त्यांना हा बहुमान मिळाला आहे.

कास पठारावरील या दुर्मीळ शेवाळ प्रजातीला आता ‘नॅव्हिक्‍युला वाटवेइ’ या नावाने ओळखले जाईल. याबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. वाटवे म्हणाल्या, ‘‘माझ्या अभ्यासाचा सर्व भर पर्यावरण संरक्षणावर आहे. काही वेळा आवडले म्हणून, तर कधी भाग पडले म्हणून हे पैलू अभ्यासले गेले. शाश्वत विकासाच्या दिशेने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग कसा मिळवता येईल, हे महत्त्वाचे वाटले. काससारख्या ठिकाणी फोफावलेल्या पर्यटनाच्या महाभयंकर लाटेमुळे या ठिकाणी असलेल्या वनस्पती, कीटक, पक्षी व प्राण्यांचा संपन्न अधिवास धोक्‍यात येऊ लागला. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही धडपडलो. यासाठी राबणाऱ्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे.’’

ब्राझील ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांचे जाळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, ‘‘डॉ. स्टेफान पोरेंबस्की या जर्मन संशोधकाच्या पाठबळामुळे हा अभ्यास सखोलपणे केला गेला. पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉ. कार्तिक बाला यांच्या पुढाकाराने हे काम चांगले झाले. प्रेरणा अगरवाल यांचाही यात सिंहाचा वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT