पुणे

रागाने निघून गेलेला ऋषिकेश पोलिसांच्या सतर्कतेमुळे विसावला आईच्या कुशीत

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट : रात्रीची साडेअकराची वेळ...विमनस्क अवस्थेत चिमुकला भांबावलेल्या अवस्थेत हॅाटेसमोर उभा...मराठी तर सोडाच पण हिंदीही न बोलता येणारा ...हॅाटेल मालकाचे लक्ष गेल्यावर त्यांच्यातील माणुसकी जागी झाली ....चिमुकल्याला जवळ घेऊन खाऊ पिऊ घातले ... पौड पोलिसांना तातडीने कळवून त्याला स्वतःच्य़ा घरीच रात्रभर ठेवले ...पोलिसांनी सकाळी त्या चिमुकल्याला विश्वासात घेऊन घर शोधले आणि चिमुकला आईच्या कुशीत विसावला.

ही घटना काल रात्री ते आज दुपारी एक या कालावधीत घडली बावधन आणि भुगावच्या परिसरात. हॅाटेल चालक आणि पोलिस यांच्या माणुसकीने, सावधानतेमुळे एका चिमुकल्याला पुन्हा कुटुंब पाहायला मिळाले. त्य़ामुळे हॅाटेल चालक आणि पौड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, ऋषिकेश तोमिन राजवंशी हा नेपाळी मुलगा आईवडिलांसमवेत बावधन येथे राहायला आहे. त्याचे वडील परिसरात वॅाचमनचे काम करतात. काल रात्री ऋषिकेशला त्याच्या आईने मारल्याने रागाच्या भरात तो बावधन (ता. मुळशी) येथून पायी चालत चालत भुगाव येथे पोचला. रात्रीच्या साडेअकरा वाजता तो भूगाव येथील जय भवानी हॅाटेलसमोर आल्य़ावर 
भांबावला.

दरम्यान, हॅाटेलचे चालक सतीश जाधव यांचे लक्ष त्याच्याकडे गेल्याने त्यांनी त्याला जवळ घेतले व खायला दिले. त्यानंतर त्यांनी रात्रीच लगेच पौड पोलिस ठाण्याचे  गणेश साळुंके यांना फोन केला. जाधव कुटुंबाचा स्वभाव लक्षात घेऊन साळुंके यांनी त्याला तिथेच रात्रभर ठेवून घेण्याची विनंती केली. ऋषिकेशला मराठी अथवा हिंदी येत नसल्याने समस्या निर्माण झाली होती. तरीही काही तोडक्या मोडक्या शब्दांतील त्याच्याकडून माहिती करून घेतली . मात्र त्याला आईने मारल्यामुळे त्या रागाच्या भरात मला आई-वडील नाहीत असेच सांगत होता. त्यामुळे पौड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आज सकाळी महिला पोलिस हवालदार अनिता रावळेकर यांच्यावर ऋषिकेशची जबाबदारी सोपविली.

रावळेकर यांनी ऋषिकेशला विश्वासात घेऊन त्याचे घर शोधायला सुरवात केली. प्रथम घराचा ठावठिकाणा सांगण्यास टाळाटाळ करण्याऱ्या या चिमुकल्याला शाळा कुठे आहे याची विचारणा केली. त्यानंतर त्याने प्रथम शाळा दाखविली. त्यानंतर आणखी विश्वासात घेतल्यावर दुपारी एक वाजता त्याच्या घराचा शोध लागला आणि पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. ऋषिकेशला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिल्यावर समाधानाच्या मानसिकतेत पोलिसांनी त्याचा निरोप घेतला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT