Aparna Kadu sakal
पुणे

HSC Exam Result : दिव्यांग मुलासाठी आई झाली बारावी पास

वारज्यात राहणाऱ्या अपर्णा निवृत्ती कडू या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वारजे - वारज्यात राहणाऱ्या अपर्णा निवृत्ती कडू या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. आपल्या दिव्यांग मुलांसाठी २८ वर्षानंतर परीक्षा देऊन त्यात यश मिळवणाऱ्या अपर्णा यांचे सध्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

लवकर लग्न झाल्यामुळे अपर्णा यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. लग्न करून सासरी गेल्यावर पुढील शिक्षणाचे दरवाजे बंद झाल्यामुळे संसाराच्या रहाटगाडग्यात त्या रमून गेल्या. त्यातूनच अचानक आपले दुसरे अपत्य दिव्यांग आहे, असे त्यांच्या लक्षात आले. या मुलाच्या उपचारासाठी अनेक प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे त्यांनी मुलाचे सत्य स्वीकारले.

पुढे कोरोनामुळे त्यांनी उभा केलेला टूर्स ट्रॅव्हल्सचा व्यवसाय बंद पडला. गाड्या विकाव्या लागल्या. यामुळे मानसिक निराशा वाढली. यादरम्यान दिव्यांग मुलांच्या संस्थेतील संचालकांनी सुचवले की, जर तुम्ही बारावी उत्तीर्ण झालात, तर तुम्हाला दिव्यांग मुलांना शिकवण्याचा कोर्स करता येईल.

या एका जिद्दीतून शेवटच्या टप्प्यात सरकारने दिलेल्या मुदतवाढीत बारावीचा १७ नंबरचा फॉर्म भरला. काही शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यामुळे आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपर्णा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT