पुणे

पोटच्या मुलांचा गळा घोटणाऱ्या मातेला जन्मठेप

CD

पौड, ता. ३१ : रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा घोटून खून करणाऱ्या आईला जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यातील शिरवली येथे तिने हे अमानुष कृत्य केले होते. न्यायालयाने तिला तीन वर्षे सक्तमजुरीही ठोठावली आहे.
पूना संजय सोलंकी (वय २८, रा. मेरिखेडा, ता. हरसूद, जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश) असे शिक्षा झालेल्या नराधम मातेचे नाव आहे. ती पती संजय, मुलगी चंदा (वय साडेतीन वर्षे) आणि मुलगा आनंद (वय दोन वर्षे) यांच्यासह शिरवली येथील एका खाजगी बांधकामावर राहत होती. पती संजय मजुरीचे काम करत असे.
पूना मुलांचा नेहमी रागराग करायची आणि किरकोळ कारणांवरून त्यांना मारहाण करायची. याबाबत पतीने तिला अनेकदा समजावले होते. मात्र, ५ जानेवारी २०२२ रोजी दुपारी एकच्या सुमारास पूनाने रागाच्या भरात दोन्ही मुलांना जवळच्या झुडपात नेले. तेथे दोरीने दोघांचाही गळा आवळून त्यांना जीवे मारले.
मुलांचे मृतदेह झुडपातच टाकून ती लोणावळा येथे भावाकडे निघून गेली. पती संजय यांनी पत्नी व मुलांचा शोध घेतला असता, मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांनी पत्नीविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तत्कालीन पोलिस निरीक्षक (कै.) अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या खुनाचा छडा लावून पूना हिला अटक केली होती.
याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे खटला चालला. मकोकाचे विशेष न्यायाधीश एस.बी.भंसाळी यांच्यासमोर सुनावणी झाली. पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि खुनात वापरलेले साहित्य याच्या आधारे न्यायालयाने पूना हिला दोषी ठरवले. तिला दोन्ही मुलांच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, तसेच तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील विजय फरगडे आणि अनिलकुमार वर्मा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

Gokul Election Officer Transfer : गोकुळच्या घडामोडींना नवे वळण; निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये भाजपचे 'लोकशाही बचाव, अराजकता हटाव' आंदोलन; हातात तिरंगा घेत काँग्रेसविरोधात काढली जोरदार रॅली

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SCROLL FOR NEXT