Ramp-Work 
पुणे

मदर तेरेसा पुलाच्या रॅम्पचे काम वेगात (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील सर्वाधिक लांबीच्या संत मदर तेरेसा पुलावर ये-जा करण्यासाठी एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ रॅम्प बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, दोन्ही बाजूला त्यासाठी १८ खांब उभारण्यात आले आहेत. उर्वरित दोन खांब उभारणीचे कामही सुरू असून, येत्या चार महिन्यांत रॅम्पचे काम महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात येईल. रॅम्पवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

एम्पायर इस्टेटमधून जाणारा हा पूल जुना पुणे-मुंबई रस्ता, लोहमार्ग, पिंपरी-चिंचवड लिंक रोड आणि पवना नदी असे चार टप्पे पार करून काळेवाडीत पोहोचतो. त्यामुळे काळेवाडी व लगतच्या भागातून भोसरी औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी कामगारांना तो सोयीचा ठरला आहे. 

२००९ मध्ये या प्रकल्पाची सुरवात झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर २०१८ प्रकल्प पूर्ण झाला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते १४ मे रोजी या पुलाचे उद्‌घाटन झाले. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्याला जोडणारा सव्वादहा किलोमीटर लांबीचा बीआरटी रस्ता आणि १.६ किलोमीटर लांबीचा पूल असा हा प्रकल्प २१३ कोटी रुपयांचा आहे. ४५ मीटर रुंदीच्या या रस्त्यावर मध्यभागी बीआरटी बससेवेसाठी स्वतंत्र मार्ग बनविण्याचे कामही सुरू आहे.

तर, या पुलासाठी ९८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, पुलावरून पुणे-मुंबई रस्त्यावर ये-जा करणे सध्या सोयीचे नसल्याने, त्याचा वापर कमी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच महापालिकेने एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ दोन्ही बाजूला रॅम्प बांधण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, सोसायटीच्या सभासदांनी त्याला विरोध केला. मात्र, रॅम्प न बांधल्यास पुलाचा उद्देश पूर्ण होणार नाही. त्यामुळे सोसायटीसाठी पुरेसा रस्ता ठेवून रॅम्प बांधण्याची भूमिका महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली.

संत मदर तेरेसा पुलाच्या रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बीआरटीचे कामही सुरू असून, बसथांब्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रॅम्पवरून वाहतूक सुरू केल्यानंतर या पुलावरील वाहतूक वाढेल; तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटेल.
- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटी, महापालिका

रॅम्पचे फायदे...
    काळेवाडी फाट्याकडून येणाऱ्या नागरिकांना पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशनकडे जाण्यासाठी रॅम्पवरून उतरता येणार.
    पुण्याच्या दिशेला जाण्यासाठी पुणे-मुंबई रस्त्याच्या पलीकडे दुसरा रॅम्प. हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला.
    पुण्याकडून आलेल्या वाहनांना काळेवाडी फाट्याकडे जाण्यासाठी रॅम्पचे बांधकाम सुरू. 

पुलाची लांबी - १.६ किलोमीटर
रुंदी - ४५ मीटर
खर्च - ९८ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT