food stall 
पुणे

पडेल ते काम करणार पण पोरीला शिकवणार; संकटांना पुरुन उरणारी आई

सकाळ डिजिटल टीम

रामवाडी - पडेल ते काम आणि कितीही कष्ट करायला लागलं तरी चालेल पण मुलीला शिकवणारच असा निश्चय एका आईनं केलाय. आयुष्यात लागोपाठ येणाऱ्या संकटांवर मात करून ती आई समर्थपणे आव्हान पेलत आहे. पुण्याहून कर्नाटकात दोन वर्षापूर्वी सिलविया डी कामाच्या शोधात आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र अशा परिस्थित खचून न जाता न डगमगता त्यांनी पडेल ते काम केलं. यातून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि 8 वर्षांच्या चिमुकलीच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. 

कर्नाटकहुन पुण्यात आलेल्या सिलविया डी.यांचे इंग्रजी माध्यमातून M.A.B.Ed पर्यत शिक्षण झालं आहे. त्यांनी सहा महिने एका खासगी शाळेत नोकरी केली. मुलीचे शिक्षण, घरभाडे दररोजचा खर्च यामुळे कमी वेतन असल्याने शाळेची नोकरी सोडली. त्यानंतर मेस सुरु केली पण कोरोनाच्या काळात ती बंद झाली. शेवटी खराडी येथील बी.पी.ओ.मध्ये काम मिळाले पण रात्रीच्या वेळी घरामध्ये मुलीला एकटे सोडुन जाता येत नसल्याने ते काम  सोडुन द्यावे लागले. 

सध्या वडगावशेरी,खराडी,कल्याणी नगर, विमाननगरच्या परिसरात ज्या ठिकाणी स्पोर्ट्स सुरु असतात त्या ठिकाणी घरी बनवलेले पौष्टीक पदार्थं घेऊन जातात आणि त्या ठिकाणी आपला स्टॉल लावतात. स्टॉलवर खाद्य पदार्थ विक्रीतून मिळणाऱ्या पैशामध्ये माय लेकीचा उदरनिर्वाह सुरु आहे.  

सिलविया डी म्हणाल्या की, पुण्यासारख्या मोठया शहरात मी आले. मनात भीती होती कसं होईल? काय होईल ? पण पदोपदी चांगली लोक मला भेटत आहेत. त्यांचे सहकार्य लाभत असल्याने मी छोटासा व्यवसाय सुरु करू शकले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT