पुणे

पथारीवाल्‍यांमुळे रेंगाळतेय वाहतुक

CD

मोती चौक- जुना मोटार स्टँड मार्ग कोंडीत

पथारीवाल्यांच्या अतिक्रमणाने वाहतूक ठप्प; हॉकर्स झोनचा प्रस्ताव रखडला

सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. २८ : शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या मोती चौक ते जुना मोटार स्टँड या मार्गावर पुन्हा एकदा पथारीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतूक रोजच रेंगाळत आहे. पदपथविक्रेत्यांच्या साहित्याने रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असून, याकडे पालिका आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

पालिकेने मोती चौक ते ‘पाचशे एक पाटी’दरम्यान सिमेंट काँक्रिट रस्ता करण्याचा निर्णय घेत प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर या मार्गावर ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करत अतिक्रमण हटविण्याची कारवाईही करण्यात आली होती. मात्र, पर्यायी व्यवस्था न झाल्याने पुन्हा पथारीवाल्यांनी या मार्गावर आपले बस्तान मांडले आहे.

पदपथ विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी जुन्या मंडई परिसरात हॉकर्स झोन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. संयुक्त पाहणीही झाली; परंतु त्यानंतर हा प्रस्ताव पुढे सरकलेला नाही. परिणामी, अतिक्रमणाचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला आहे. विशेष म्हणजे, काही दुकानदारांकडून रस्त्याकडील जागा उपलब्ध करून देत पथारीवाल्यांकडून शुल्क घेतले जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, रिक्षा थांबे, सौंदर्य साहित्य विक्रीच्या हातगाड्या, झाडू-केरसुणीचे ढीग, दुकानांसमोर ठेवलेले साहित्य आणि वाहनतळांवरील लोखंडी जाळ्या यामुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी होत आहे. याचा थेट परिणाम वाहतूक कोंडीवर होत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


पुनर्वसनच उपाय

बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना आवश्यक वस्तू पथारीवाल्यांकडून मिळत असल्या, तरी त्यांच्या अनियंत्रित विस्तारामुळे वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांचे नियोजनबद्ध आणि तातडीने पुनर्वसन करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

.............


व्यावसायिकांनी घ्यावा पुढाकार

या भागात दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. पार्किंगची अपुरी व्यवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहकांचा ओढा कमी होण्याची शक्यता आहे. याचा फटका स्थानिक व्यवसायांनाच बसू शकतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेत सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक ठरत आहे.
...............


15422
सातारा : रस्‍त्‍याकडेला दुकान मांडून बसलेले विक्रेते. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा).
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT