Aryan Chavan sakal
पुणे

Motivation News : पालात राहणाऱ्या आर्यनची नवोदय विद्यालयात निवड

आई वडील मजूर, निवाऱ्यासाठी घर नाही, अभ्यासासाठी वीज नाही फक्त तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पाल तयार केले आहे.

नवनाथ भेके

निरगुडसर - आई वडील मजूर, निवाऱ्यासाठी घर नाही, अभ्यासासाठी वीज नाही फक्त तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पाल तयार केले आहे. अशा परिस्थितीत आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आर्यन विजय चव्हाण यांची नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यामुळे जिद्द,चिकाटी असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो हे गरीब कुटुंबातील आर्यनने दाखवून दिले आहे.

शिंगवे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आर्यन विजय चव्हाण या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे, इयत्ता पाचवीत असताना आर्यन चव्हाणने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळल्यामुळे शिंगवे व परिसरातून आर्यनचे कौतुक होत आहे.

शिंगवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या पाठीमागे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील चव्हाण कुटूंब गेली अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे,आर्यनचे वडील विजय चव्हाण हे गवंडी काम करतात. तर आई शेतांमध्ये मोल मजुरीचे काम करते. शाळेच्या इमारतीच्या पाठीमागे त्यांनी राहण्यासाठी पाल तयार केले आहे.पालामध्ये वीजेची व्यवस्था देखील नाही अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आर्यनने हे दैदिप्यमान यश मिळवले. इयत्ता पाचवीतून त्याचे आता पिंपळे जगताप येथील नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.

आर्यन चव्हाण याला वर्गशिक्षिका सुषमा कदम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लोहकरे व शिक्षकांनी त्याचा पालाकडे जाऊन आर्यन व त्याच्या आई वडीलांचा सत्कार केला.

अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला आर्यन खूप हुशार विद्यार्थी असून आर्यन याने नवोदय परिक्षेबरोबर मंथन,प्रश्नमंजुषा,अभिरूप परिक्षेत त्याने यश मिळविले आहे.तो अभ्यासाबरोबरच कबड्डी खेळ ही चांगला खेळतो. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात त्याचा सहभाग असतो.फोटो खाली ओळ: शिंगवे (ता.आंबेगाव): पालात राहणाऱ्या आर्यन चव्हाणची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल त्याचा आणि आई वडील यांचा सत्कार करताना शिक्षक वृंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

Mass Marriage Ceremony : आख्खा गावात लगीन घाई, गावाला आले यात्रेचे स्वरूप; निमगावात सात जोडपे विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले

Latest Marathi News Live Update : जिल्हा कारागृहातील कैद्याचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

Kolhapur Crime News, : 'माझ्या मुलाला फाशी द्या..'; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे शोषण, शाहिद सनदीच्या वडिलांनी मागितली गावकऱ्यांची माफी

पोलिसांवर आली 'धक्का' मारण्याची वेळ! कैद्यांनी भरलेली बस भररस्त्यात पडली बंद अन्...

SCROLL FOR NEXT