Bira Gore Sakal
पुणे

बसच्या अपघातात शिरसगाव काटा येथे दुचाकीस्वाराचा मुत्यु

भरधाव टँव्हल बसने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे रस्त्याचे काम पुर्ण होण्याच्या अगोदर पहिला बळी गेल्याची परिसरात चर्चा आहे.

प्रताप भोईटे

भरधाव टँव्हल बसने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे रस्त्याचे काम पुर्ण होण्याच्या अगोदर पहिला बळी गेल्याची परिसरात चर्चा आहे.

न्हावरे - न्हावरे (ता. शिरूर) ते आढळगाव (ता. श्रीगोंदा) या राष्ट्रीय मार्गाचे काम पुर्नत्वाच्या मार्गावर असुन अद्यापही काही कामांच्या त्रुटींमुळे शिरसगाव काटा (तालुका शिरूर) येथे भरधाव टँव्हल बसने (Bus) दुचाकीस्वाराला (Motor Cyclist) दिलेल्या धडकेत अपघातात (Accident) एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. त्यामुळे रस्त्याचे काम पुर्ण होण्याच्या अगोदर पहिला बळी गेल्याची परिसरात चर्चा आहे. अपघातात शिरसगाव काटा येथील बीरा सतू गोरे (वय ३५) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील न्हावरे, निर्वि, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी या दरम्यान राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत रस्त्याचे नव्याने काम पुर्ण होत आले आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर अद्यापही पक्कया स्वरूपाचे गतीरोधक बनवले नसल्यामुळे भरधाव वेगाने वाहने धावु लागले आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातात वाढ झाली आहे. खबरदारी व संभाव्य अपघाती धोका टाळण्यासाठी मागील चार महिन्यापासून या मार्गावरील प्रमुख गावाच्या दरम्यान गतीरोधक तयार करण्यास ठेकेदाराने प्राधान्य द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

कारण, संबंधित गावांच्या नजिक नागमोडी वळणे त्याचबरोबर रस्त्यानजिक छोटी मोठी दुकाने आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची रस्त्यावर कायमच वर्दळ असते. यादरम्यान, वाहनचालकांना गाडीवर नियंत्रण(ताबा) ठेवता येत नाही. म्हणून गतीरोधकांची आवश्यकता आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक नरेंद्र माने व माणिक कदम यांनी केली. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामूळेच बिरा गोरे यांचा बळी गेल्याची चर्चा आहे. अपघात झाला त्यादरम्यान चौकात मोठी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. मात्र, मांडवगण फराटा येथील पोलिसांनी जमाव शांत केला व वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला.

याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता दिलीप तरडे यांच्या शी संपर्क झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT