दौंड, ता. २३ : लिंगाळी येथील खासगी प्रशिक्षण संस्थेतून एक दुचाकी वाहन चोरीस गेले आहे. दौंड- लिंगाळी रस्त्यालगत ही चोरी झाली. दौंड पोलिसांनी याबाबत माहिती दिली. लिंगाळी येथील एका खासगी प्रशिक्षण संस्थेत पोलिस भरतीची तयारी करणारे प्रथमेश प्रभाकर जाडकर (वय २३, हल्ली रा. अशोकनगर, लिंगाळी, ता. दौंड) यांची दुचाकी चोरीस गेली आहे. बजाज कंपनीची पल्सर मॅाडेलची सत्तर हजार रुपये मूल्य असलेली ही दुचाकी १७ जूनला चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दौंड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २२) प्रथमेश जाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.