पुणे

पुणे : सुलज्जा मोटवानी, कटारांना 'प्राइड ऑफ बीएमसीसी'

सकाळवृत्तसेवा

पुणे : बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दिला जाणारा यंदाचा 'प्राइड ऑफ बीएमसीसी' पुरस्कार कायनेटिक ग्रीन एनर्जी ऍण्ड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेडच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि होप फाउंडेशनच्या अरुणा मुकेश कटारा यांना जाहीर झाला आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. जी. बापट आणि प्रा. एन. डी. आपटे यांची बीएमसीसी गुरुवर्य पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार येत्या रविवारी (ता.8) कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते प्रदान केले जाणार असल्याचे बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ आणि बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी बुधवारी (ता.4) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे किशोर लोहकरे, दिनकर अष्टेकर, सीमा तोडकर, सुरेश कोकणे, संजय साबळे, बाळासाहेब गांजवे, सचिन नाईक, सुहास पटवर्धन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात युगा बिरनाळे आणि सिद्धार्थ कांबळे यांना कांतामगर क्रीडा पुरस्कार, भरत फाटक यांना स्व. वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार, सतीश जकातदार यांना स्व. बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार, नारायणदास राठी यांना व्यवसाय भूषण पुरस्कार, तनिष्का देशपांडे यांना 'फळणीकर पुरस्कार' आणि सक्षम कुलकर्णी यांना सुहास कुलकर्णी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

शिवाय या कॉलेजचे दानशूर माजी विद्यार्थी पुरुषोत्तम लोहिया, दिलीप ओक, डॉ. विक्रम मेहता आणि कांतिलाल बलदोटा यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT