Dr. Manisha Sonawane sakal
पुणे

हडपसरच्या लेकीने माऊंट एल्बूस शिखरावर तिरंगा फडकवून साजरा केला स्वातंत्र्यदिन

शिखरावरील चढाई यशस्वी होताच त्यांनी राष्ट्रगीत गात तिरंगा फडकावला

कृष्णकांत कोबल

हडपसर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून येथील डॉ. मनिषा सोनावणे यांनी युरोप खंडातील "माऊंट एल्बूस' हे सर्वोच्च शिखर सर केले. शिखरावरील चढाई यशस्वी होताच त्यांनी राष्ट्रगीत गात तिरंगा फडकावला. याशिवाय फलक दाखवून "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' चा संदेशही त्यांनी या शिखरावरून दिला. या शिखरावर तिरंगा फडकवणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीचे वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांकडून कौतुक होत आहे.

माऊंट एल्बूस हे शिखर रशिया मध्ये असून या शिखराची उंची १८ हजार ५१० फूट एवढी आहे. ते युरोप खंडातील सर्वोच्च शिखर आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ९ ते १८ ऑगस्ट या शिखरावरील मोहीम आखण्यात आली होती. मात्र, पंधरा ऑगस्टलाच शिखर सर करायचे ध्येय असल्याने डॉ. मनिषा यांच्यासह मोहिमेतील सहकाऱ्यांनी उणे २५ अंश तापमान व ताशी ५० ते ५५ किलोमीटर वार्‍याचा वेग अंगावर झेलत मोहीमेला सुरुवात केली. दरम्यान, खराब वातावरणामुळे मोहिमेतील काही सहकाऱ्यांनी माघार घेतली. डॉ. मनिषा यांच्यासह सांगलीचे अभय मोरे, मुंबई फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत असलेले प्रणित शेळके व योगेश बडगुजर या चार जणांनी ही मोहीम सर्व अडचणीवर मात करीत फत्ते केली. या मोहिमेसाठी डॉ. मनिषा यांना एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. मनिषा यांनी याआधी सप्टेंबर २०२१ मध्ये आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजरो सर केले आहे. तसेच महाराष्ट्रातील अवघड श्रेणीतील अनेक गडकिल्ले व सुळकेही सर केले आहेत. याशिवाय हिमालयामधील अनेक ठिकाणी ट्रेकींग केले आहे.

"वाऱ्याचा वेग इतका होता की एरव्ही आल्हाददायक वाटणारा हिमकणांच्या माऱ्याने चेहऱ्याला चांगलाच त्रास होत होता. समोर पाच फूटांवरील सुध्दा काहीच दिसत नव्हते. अशा खडतर वातावरणात युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्बूसवर जाऊन तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हणने माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. माझी मोहीम यशस्वी होण्यासाठी माझे पती डॉ सतिश, आई वडील, सासू सासरे, आणि मुले या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे.'

डॉ. मनिषा सोनावणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT