44_358_1436_798.jpg 
पुणे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पुण्यात आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

पुणे : प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुण्यातील महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त, जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अंगणवाडी सेविका जमा झाल्या होत्या. दुपारी बारा वाजता महिला बालविकास विभागाच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा नेण्यात आला. तेथे ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी संघाचे जिल्हा सचिव नीलेश दातखिळे, सहसचिव विठ्ठल करंजे, सुमन फदाले, शारदा शिंदे, रंजना कानडे, नयना वाळूंज, सोनाली पावडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

ज्या अंगणवाडीत पंचवीसपेक्षा कमी मुले आहेत, त्या अंगणवाड्या बंद करून शेजारच्या अंगणवाडीत मुलांना समाविष्ट करण्याचा काढलेला आदेश त्वरित रद्द करावा, लाइन लिस्टिंगच्या व आधार नोंदणीच्या कामाची सक्ती बंद करावी, नगरपालिका व महानगरपालिकाकडे अंगणवाडी केंद्राचे होणारे हस्तांतराचा आदेश त्वरित रद्द करावा. मिनी अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात करावे, अंगणवाडी केंद्रांचे भाडे नवीन परिपत्रकाप्रमाणे द्यावे, बचत गटाची आहाराची बिले व फेडरेशन अंतर्गत आहारातील थकीत इंधन बिले देऊन इंधन दरात वाढ करावी, सेवानिवृत्त झालेल्यांना एक रकमी सेवासमाप्तीच्या लाभाची रक्कम तातडीने द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन महिला बाल विकास विभागाचे उपयुक्त दिलीप हिवरळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांना सुनीता लोंढे, रेखा कांबळे, मंजुळा झेंडे, स्वाती भेगडे, छाया भुजबळ, बिस्मिल्ला तांबोळी यांच्या हस्ते देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT