पुणे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणिस यांना निवेदन देताना भोर तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी. 
पुणे

महामार्गावरील खड्डे दहा दिवसात न भरल्यास आंदोलन; युवक काँग्रेसचा इशारा

किरण भदे

नसरापूर - पुणे-सातारा महामार्गावर सारोळा ते शिंदेवाडी दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले असुन, यामुळे अपघात होत असुन प्रवाशी जखमी होत आहेत. हे खड्डे येत्या दहा दिवसात भरले गेले नाहीतर, रस्त्यावरच तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भोर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने महामार्ग प्रधिकरणाला देण्यात आला आहे.

भोर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणिस यांना महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात आज निवेदन देण्यात आले यावेळी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष महेश टापरे, अनिल सावंत, महेश बोबडे, निलेश भोरडे, प्रकाश भोरडे, लहु साळुंके, हनुमंत कारभळ, प्रविण कोंढाळकर, सागर टापरे, आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवेदनात राष्ट्रीय महामार्गावर भोर तालुक्यातील शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यान रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष चालु असुन, या अपुर्ण कामामुळे अनेक अपघात झाले असुन हजारो नागरीकांचे प्राण गेले आहेत. तरी देखिल अद्याप काम चालुच आहे. झालेल्या निकृष्ठ कामामुळे या अंतरात अनेक खड्डे पडले असुन, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, वाहतुक कोंडी, अपघात, गाडांचे नुकसान होत असुन, हे तातडीने थांबण्यासाठी येत्या दहा दिवसात सारोळा ते शिंदेवाडी दरम्यान रस्त्यावरील खड्डे न भरले गेल्यास भोर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन स्विकारल्यावर प्रकल्प अधिकारी चिटणिस यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकारयांना या बाबत ताताडीने कार्यवाही केली जाईल, असे सांगुन त्यांनी दिलेल्या मुदतीत रस्त्यावरील खड्डे भरले जातील, अशी ग्वाही दिली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

SCROLL FOR NEXT