Brahman Fedration aggitation Pune 
पुणे

मिटकरींच्या भाषणाविरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाचं आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आनंद दवे यांनी सहकाऱ्यांसह आंदोलन केलं

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोर मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघानं पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी महासंघाचे प्रमुख अनिल दवे यांनी आपल्या सहकार्यांसह मिटकरींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. (Movement of Brahmin Federation and Anand Dave in Pune against Amol Mitkari speech)

आनंद दवे म्हणाले, अमोल मिटकरी हे मूर्ख आहेत. ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असं आम्ही म्हणतच नाही. त्यांनी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नव्हतं पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीनं वापरला यावर आमचा आक्षेप आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी वक्तव्य वापरलं आहे हे चुकीचं आहे. हेच विधान ते नमाजविरोधात बोलू शकतील का? हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध करत आहोत. असा मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नाही, असा आक्षेपही त्यांनी घेतला नाही.

या आंदोलनाविरोधात स्पष्टीकरण देताना अमोल मिटकरी म्हणाले, माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाही. मी कोणाबद्दलही अपशब्द बोललेलो नाही. मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला. यामध्ये कोणालाही त्रास होण्याचं कारण नाही. त्यामुळं भाषणाचा विपर्यास करुन वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचं कटकारस्थानं केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT