Pune Crime News Esakal
पुणे

Pune Crime News: पुण्यात वाईन शॉपवर फिल्मी स्टाईल दरोडा, पाच जणांना अटक; आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश

पुण्यातील उत्तमनगर भागातील एका वाईन शॉपवर फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकण्यात आला होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील उत्तमनगर भागातील एका वाईन शॉपवर फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकण्यात आला होता. 3 लाखांच्या रोकडसह दारूच्या बाटल्या लंपास करण्यात आल्या होत्या. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी ग्राहकांची वरदळ असताना या दरोडेखोरांनी हे धाडस केलं. या दरोडेखोरांनी हातात कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत हे वाईन शॉप लुटलं होतं. याप्रकरणी ६ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, वाईन शॉपवर दरोडा टाकलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एकूण पाच जणांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या पाच आरोपींपैकी चार जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, हत्यार असा तीन लाख 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चार अल्पवयीन मुलांना बाल न्यायमडळात दाखल केले असून एका आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी पाच जणांनी मिळून उत्तम नगर भागात हातात बंदुक, कोयता घेऊन वाईन्स शॉपवर दरोडा घातला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास पाच ते सहा जणांनी तलवार आणि पिस्तूलचा धाका दाखवत वाईन शॉप मध्ये घुसले. वाईन शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तलवार आणि पिस्तूलचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड, आणि ब्लेंडर्स प्राईडच्या तीन हजार दोनशे रुपयांच्या दोन बाटल्या घेऊन गेले.

त्यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीने हवेत तलवार फिरवत "कोण मध्ये आलं तर त्याला मारून टाकू" अशी धमकी दिली. त्यानंतर सगळे दरोडेखोर तिथून पसार झाले होते. याप्रकरणी आता उत्तमनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT