Shivputra Sambhaji Mahanatya sakal
पुणे

Shivputra Sambhaji Mahanatya : खासदार डॉ. कोल्हे यांचे "शिवपुत्र संभाजी" महानाट्य हडपसरमध्ये विनामूल्य

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य व तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारे 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य पाहण्याची संधी हडपसर परिसरातील नागरिकांना मिळणार आहे.

कृष्णकांत कोबल

हडपसर - स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य व तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारे 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य पाहण्याची संधी हडपसर परिसरातील नागरिकांना मिळणार आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे स्वत: शिवपुत्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतून हा शौर्यपट आपल्यासमोर उलगडणार असून त्यांच्या "जगदंब प्रतिष्ठान' च्या वतीने तीन दिवस प्रेक्षकांना त्याची मोफत पर्वणी घेता येणार आहे.

या महानाट्याचे तीनही दिवसांचे प्रयोग विनामूल्य आहेत. येत्या ९ ते ११ मार्च दरम्यान मुंढवा रेल्वे पुलाशेजारी सायंकाळी ६ ते १० या वेळेत हे प्रयोग होणार आहेत. खासदार डॉ. कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती शंभुराजांची करारी व तडफदार भूमिका व त्यांची प्रेक्षकांमधील चित्तथरारक घोडेस्वारी, नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा, त्यावेळची आतिषबाजी, तडाखेबाज संवाद, किल्ल्याचा तीन मजली भव्य रंगमंच, दीडशे कलाकार, २२ फुटी जहाजावरून केलेली जंजिरा मोहीम, शंभुराजे आणि अनाजीपंतांची जुगलबंदी, थेट प्रेक्षकांमधून गनिमी काव्याने केली जाणारी बुऱ्हाणपूर मोहीम, जिवंत तोफा ही या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत.

'भोसरी व त्यापाठोपाठ अहमदनगर येथे झालेल्या या नाटकाच्या प्रयोगांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हडपसर येथे प्रथमच होत असलेल्या या महानाट्याबद्दल नागरीकांमध्ये उत्सुकता आहे. कात्रज, कोंढवा, एनआयबीएम, मांजरी, साडेसतरानळी, केशवनगर मुंढवा, महंमदवाडीसह संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी या महानाट्य रोमांचकारी अनुभव घ्यावा,' असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निधी मंजुरीसाठी मागितली लाच, ६ लाखांची रोकड स्वीकारताना मंत्रालयातला अधिकारी अडकला सापळ्यात; खारघरमध्ये रंगेहाथ पकडलं

तुम्हीच लग्न करून मुलं का जन्माला का घालत नाही, शंकराचार्यांचा सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल

भारताची लेक बनणार वॉशिंग्टनची महापौर? कोण आहे ३१ वर्षीय रिनी संपत?

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

Sunetra Pawar: अवकाळी पावसामुळे हातात आलेलं पीके गेली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, बारामतीतील शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी..

SCROLL FOR NEXT