dr Amol Kolhe
dr Amol Kolhe 
पुणे

खासदार अमोल कोल्हे यांना धमकी, तीन जणांवर गुन्हा

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिवीगाळ करून धमकी देऊन त्यांच्या विषयीचा आश्लिल व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 


या प्रकरणी सूनील गजरे  पाटील (रा. नऱ्हे रोड, नवले इंडस्ट्रीयल इस्टेट, पुणे), दर्शन निर्मळ (रा. शिर्डी, ता. राहाता, जि. नगर), धनंजय घाटुळे (रा. घाटुळे वस्ती, पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

जुन्नर तालुक्यातील विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व शिरोली येथील अक्षय बोऱ्हाडे यांच्यामधील वादात खासदार डॉ. कोल्हे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आरोपींनी बाबाराजे गणपतराव देशमुख फ्रेंड सर्कल महाराष्ट्र राज्य या फेसबुक ग्रुपवर आरोपींनी पाठराखण करणार्‍यांची गय नाही, आम्ही मावळे घरात घुसून मारतो, ध्यानात घे, शिर्डीला ये पुन्हा तुझ्या खालून गोळ्या घालतो, असा आशय असलेली बदनामीकारक व धमकी देणारी पोस्ट टाकली होती. याबाबत सागर शशिकांत भुजबळ (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  भा.द.वि. क २९४, ५००, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT