girish bapat google
पुणे

श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करण्याची खासदार बापट यांची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

सॅलिसबरी पार्क उद्यान नामांतर प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणी स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

सॅलिसबरी पार्कमध्ये महापालिकेने उभारलेल्या उद्यानाला सॅलिसबरी पार्क उद्यान असे नाव द्यावे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यासाठी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट असोसिएशन गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. रहिवाशांनी याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही साकडं घातलं आहे. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेनंतर खासदार बापट म्हणाले , ''सॅलिसबरी पार्क मधील रहिवासी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. महापालिकेच्या विकास कामांना कुटुंबीयांची नावे देण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, ते योग्य नाही. त्यामुळे रहिवाशांच्या भावनांची दखल घ्यावी असे मी भिमाले यांना सांगितले आहे. परंतु त्यांनी त्याबाबत कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे.''

लोकप्रतिनिधी म्हणून मी गेल्या पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ शहरात कार्यरत आहे. परंतु कुठेही माझ्या कुटुंबातील लोकांची नावे महापालिकेच्या पैशाचे उभारलेल्या विकासकामांना दिलेली नाहीत. एखाद्या व्यक्तीचे समाजासाठी योगदान असेल तर त्यांची दखल घेणे, हा भाग वेगळा. परंतु, कुटुंबीयांची नावे विकासकामांना देणे योग्य नाही. भारतीय जनता पक्ष सदैव नागरिकांनी सोबतच असतो आणि या पुढील काळातही त्यांच्या बरोबरच राहील, अशी ग्वाही बापट यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT