Gaja Marne Meet MP Nilesh Lanke Esakal
पुणे

Nilesh Lanke: गज्या मारणेच्या भेटीवर खासदार निलेश लंकेचं स्पष्टीकरण; म्हणाले 'माझं जाणं पुर्वनियोजित...'

Gaja Marne Meet MP Nilesh Lanke: कुख्यात गुंड असून त्याने निलेश लंके यांची भेट घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भेटीनंतर खासदार निलेश लंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले ही अपघाती भेट होती, असं लंकेंनी म्हटलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी आज गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होते आहे. कुख्यात गुंड असून त्याने निलेश लंके यांची भेट घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भेटीनंतर खासदार निलेश लंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले ही अपघाती भेट होती, असं लंकेंनी म्हटलं आहे.

भेटीबाबत बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, ही अपघाती भेट होती. दिल्लीची कामे आवरून मी काल एअरपोर्टला आलो. त्यानंतर एक पवार नावाचा आमचा एक सहकारी होता. त्याचं कॅन्सरच्या आजाराने निधन झालं. त्यामुळं मी त्यांच्या घरी गेलो होतो. कुटुबियांची सांत्वनपर भेट झाली. त्यानंतर आमचा एक कार्यकर्ता आहे प्रवीण धनवे. त्याच्या घरी जाताना काही ४ ते ६ लोकांनी मला हात केला. त्यानंतर आम्ही थांबलो, त्यांनी आग्रह केला. आम्ही घरी गेलो. चहा घेतला तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला. तो पर्यंत मला त्या व्यक्तीची कोणती पार्श्वभूमी आहे मला माहिती नव्हती, असं निलेश लंके म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितलं पुण्यातील मित्रांचे मला तासाभरानी फोन आले. ज्या भागात गेला होता तो कार्यक्रम पुर्वनियोजित होता का? त्यावर मी सांगितलं सांत्वनपर भेट होती. बाकी कोणाकडे जाणं माझं पुर्वनियोजित नव्हतं. त्यानंतर मला पार्श्वभूमी माहिती झाली. ही भेट अपघाती आहे. नकळत ती चूक घडली असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

गुंड गजा मारणे यांच्याविरोधात अनेक गुन्ह्याची नोंद असून त्यांच्याविरोधात अनेक खटले सुरु आहेत. यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्याचा देखील समावेश आहे. मागे त्याने अजित पवार गटाचे पार्थ पवार यांची भेट घेतली होती, त्यावरुनही वाद निर्माण झाला होता.

निलेश लंके हे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये जायंट किलर ठरले होते. त्यांनी भाजपचे सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला होता. सुरुवातीला अजित पवार गटात असलेले लंके हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदारकी लढवण्यासाठी शरद पवार गटामध्ये आले होते. त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं. या संधीचा फायदा घेत त्यांनी लोकसभेचे रिंगण जिंकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT