Untitled-6.jpg 
पुणे

खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी महत्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : "कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. या सगळ्यात राष्ट्रवादी पक्षाचे दोन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया वापरून वारंवार जनजागृती करताना दिसले. आज सांयकाळी 6 वाजता हे दोन्ही खासदार एकत्रित लाईव्ह असणार आहेत.

या दोन्ही खासदारांनी वेळोवेळी आपल्या मतदार संघाबरोबर म्हणजे सुळे यांचा बारामती व कोल्हे यांचा शिरूर या मतदार संघात त्यांनी जनजागृती तर केलीच, परंतू महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी या  दोघांनी संवाद साधून जागृती केली. या देन्ही खासदारांनी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत काेरोनाविषयी जागृती केली.

त्याचप्रमाणे या दोन्ही खासदारांनी शासकीय यंत्रणांमार्फत महाराष्ट्रातील जे नागरिक इतर राज्यांमध्ये अडकले होते त्यांना महाराष्ट्रात आणण्याचे काम केले. त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाचा वापर करत फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचा वापर करत नागरिकांनी कशी काळजी  घ्यावी याविषयी जागृती केली. तसेच नागरिकांनी आधार देत इतरही मदतीचा हात दिला.

त्याचप्रमाणे या दोन्ही खासदारांनी शासकीय यंत्रणांमार्फत महाराष्ट्रातील जे नागरिक इतर राज्यांमध्ये अडकले होते त्यांना महाराष्ट्रात आणण्याचे काम केले. त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाचा वापर करत फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचा वापर करत नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याविषयी जागृती केली. तसेच नागरिकांनी आधार देत इतरही मदतीचा हात दिला. 

हे दोनही खासदार मोठ्या प्रमाणावर गरजूंना मदत करत असून या संकटकाळात खूपच चांगले कार्य करत आहेत. डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. शिरुर मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Rally Chaos : मिरजेत अजित पवारांच्या सभेत गोंधळ; उमेदवारावर तडीपारीच्या कारवाईने समर्थक संतापले

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

SCROLL FOR NEXT