mp supriya sule meet sangram and anantrao thopate lok sabha election politics Sakal
पुणे

Bhor News : खासदार सुप्रिया सुळेनी घेतली थोपटे पिता-पुत्रांची यांची भेट; राजकीय चर्चेला उधान

शुक्रवारी त्यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला चांगलेच ऊधान आले आहे.

विजय जाधव

भोर(पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता.५) आमदार संग्राम थोपटे व राज्याचे माजीमंञी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे आणि थोपटे पिता-पुत्रामध्ये सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेत लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाली असल्याचे समजते.

मागील पाच वर्षात खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे कधीही एकत्र आले नाहीत. उलट एकमेकांवर टिका करून एका विकासकामाचे भूमीपूजनही दोघांनी वेगवेगळे केलेले आहे. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला चांगलेच ऊधान आले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी सकाळी विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सायकल वाटपाच्या कार्यक्रमाला आणि शहरातील व्यापा-यांसमवेत बैठकीसाठी भोरला आल्या होत्या.

दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी आमदार संग्राम थोपटे व माजीमंञी अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. उपमुख्यमंञी अजित पवार यांनी महायुती सरकार मध्ये सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे.

आगामी निवडणुका आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकञ लढवतील अशी चर्चा सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदरची भेट झाली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान मगिल २०१९ च्या लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होती. त्या निवडणूकीत काँग्रेस आणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी एकमेकांचे काम केले नाही. पाच वर्षात एकञ कार्यक्रम झाले नाहीत.

आमदार-खासदारांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि एकमेकांवर टिकाही केल्या. एकाच कामाचे दोन वेळा भुमीपुजनही झाले. माञ शुक्रवारी अचानक खासदार सुळे यांनी थोपटे पिता पुञाची भेट घेतल्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

यामुळे आमदार थोपटे आघाडी धर्म पाळणार का? भविष्यातील निवडणुकीत आमदार व खासदार एकमेकांचा प्रचार करणार का? आणि मागील काळात झालेल्या टिका विसरुन पुन्हा एकमेकांचे गोडवे गाणार का?

अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अगामी लोकसभा निवडणूकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजपर्यंत खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे यांनी विजयाची हँटट्रिक साधलेली आहे.

मात्र प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूकीत एकमेकांवर जिंकून येण्यासाठी एकमेकांचे सहकार्य झाले यावर आरोप-प्रत्यारोप होत होते. राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवड असो किंवा मंत्रीपद असो, प्रत्येक वेळी आमदार संग्राम थोपटे यांचे नांव आघाडीवार असतानाही त्यांच्या नावाला विरोध झाला.

खासदार सुप्रिया सुळे यांना गतवेळेच्या निवडणुकीत भोर विधानसभा मतदार संघात धावपळ करावी लागली होती. या वेळी राष्ट्रवादी पक्षातच गटातटाचे राजकारण झाले आहे. उपमुख्यमंञी अजित पवार यांनीच राष्ट्रवादीवर दावा ठोकून भाजपाशी हातमिळवणी केली असल्याने शरद पवार पर्यायाने खासदार सुप्रिया सुळे यांनी धसका घेतला आहे.

आता त्यांना काँग्रेस शिवाय पर्याय उरलेला नसल्य़ामुळे लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार थोपटे यांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरु आहे. सुप्रिया सुळे व अजित पवार या बहीण-भावाचे युद्ध रंगणार की संपणार हा प्रश्नही अनुत्तरीत असल्याने चर्चेत रंगत येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT