supriya sule 
पुणे

सुप्रिया सुळेंनी पूर्वनियोजित कार्यक्रम ढकलले पुढे; वाढत्या कोरोनामुळे खबरदारी

सकाळवृत्तसेवा

बारामती : राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी जमून प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वजण खबरदारी घेत आहोत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सुचनेनुसार आपण आपले मतदारसंघ आणि इतर ठिकाणचे सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत, असे त्यांनी कळविले आहे. 

दरम्यानच्या काळात आपल्या मतदारसंघाशी संबंधित सर्व आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात येतील. व्यक्तिशः भेटीसाठी आपण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपलब्ध असू, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच राज्यातील प्रत्येक नागरिकाने योग्य ती काळजी घ्यावी. योग्य सोशल डिस्टनसिंग राखण्याबरोबरच पुरेशी स्वछता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT