MPSC Candidate Raj Bikkad Teaching 150 students In Kalamb during corona Pandemic
MPSC Candidate Raj Bikkad Teaching 150 students In Kalamb during corona Pandemic Mahesh Jagtap
पुणे

तरुणांनो स्पर्धा परीक्षेतल्या अपयशानं सगळं संपत नाही

महेश जगताप

पुणे : धमन्यात सळसळत रक्त, दांडगा उत्साह,शोधक वृत्ती आणि कोणत्याही परिस्थितीला भिडण्याची जिद्द असेल तर माणसाला आपलं आयुष्य वेगळ्या उंचीवर नेण्यास फार काही कष्ट पडत असेल असं वाटतं नाही . असाच एक तरुण वयाच्या पंचविशीत पुण्यात दाखल झाला पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी. हा तरुण म्हणजे कळंब तालुक्यातील एका खेडेगावातून आलेला ...राज बिक्कड. गेल्या वर्षी कोरोना आला आणि राजला गावाकडेच राहावे लागले, मग करायचं काय? असा प्रश्न या युवकासमोर उभा राहिला. सहा वर्षाच्या मुलापासून ते स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी यांना घडवण्यासाठी( सुयश अकॅडमी) एक शैक्षणिक चळवळच डिसेंबरमध्ये उभी केली. आज 150 विद्यार्थी राज याच्याकडे फक्त पुस्तकीच नाहीतर आयुष्याला पुरून उरणारं शिक्षण घेत आहेत. शेकडोच्या संख्येने या रोगराईमुळे वेटिंगवर विद्यार्थी आहेत.

आपल्या देशाप्रती तळमळ लहानपणापासूनच ,आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो हा त्याचा जगण्याचा भाव. त्यामुळे या समाजाच्या आपण कामी आलो पाहिजे या दृष्टिकोनातून पोलीस खात्यात जाऊन होईल तेवढी मदत करायची अशी मनाशी खूनगाठ बांधून अभ्यासला त्याने सुरवात केली. घरची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसल्याने लातूरमध्ये एका हॉस्टेलवर राहून ग्रॅज्युएशनपासूनच नोकरी करायला सुरुवात केली. चार पाच वर्षात जमलेले लाखभर रुपये घेऊन हा तरुण पुण्यात दाखल झाला होता, पण पुण्यात राहणे म्हणजे दांडगा खर्च होतो, त्याने आणलेले पैसे एक वर्षभरात संपून गेले. त्याच्यासमोर पोट भागवायचं की अभ्यास करायचा असा प्रश्न उभारला होता. हा तरुण अतिशय चाणाक्ष ,हुशार, चपळ आणि अभ्यासू.अनेक वेळा पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी निवड होऊनही फायनल संधी हुकत होती. प्रिलियम पास होणं पुन्हा मुख्य परीक्षा देणं आणि कधी मुख्यचा निकाल न येणे तरी कधी फिजिकल चाचणी मधून बाहेर पडणे असा अपयशाचा घेरा यांच्याभोवती पडला होता. एका बाजूला आर्थिक संघर्ष तर दुसऱ्या बाजूला पाचवीला पुजलेला या परीक्षांच अपयश. या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं यासाठी तो रात्र रात्र विचार करीत बसायचा.

वयाने तोपर्यंत 32 गाठली होती. घरुन लग्नासाठी हट्ट , समाजाचे टोमेणे वेगळेच. यात खंबीर साथ लाभली ती म्हणजे त्याची अशिक्षित आईची...स्वतःच्या कष्टाने ओस पडलेल्या जमिनीलाही हिरव्यागार पिकाने रोषणाई आणणारी आपल्या पोराला अशी कशी माघार घेण्यास लावेल. "'बाळा तू लढ माझ्या श्‍वासात श्‍वास असेपर्यंत मी तुला पैसे पुरवते, कोणाचं काय ऐकायचं नाही हा तुला समाज बोलतोय ना तो फक्त आठवडे बाजाराला अर्धा किलो मटण खाऊ शकतो इतकीच त्यांची ऐपत आहे.नाव कमव बाकी काही दुसरं आयुष्यात महत्वाचं नाही'' माऊलीचे हे शब्द ऐकूण त्या तरुणाच्या मनात पुन्हा लढण्याची उर्मी जागी होत होती. आलेली मरगळ एका झटक्यात निघून जात होती. लोकांनी केलेला अपमान कोणीतरी पाठीवरून थाप मारतयं अस वाटायचं.

गेल्या वर्षी कोरोना आला आणि राजला गावाकडेच राहावे लागले, मग करायचं काय? असा प्रश्न या युवाकसमोर उभा राहिला . वेळ मिळालाच आहे तर आपला तालुका तरी आपण फिरून काढला पाहिजे. आपल्या आयुष्याला काही संधी मिळतेय का याची चाचपणी केली पाहिजे? असा विचार करून आपल्या गाडीला राजने स्टार्टर मारला. मे ते नोव्हेंबरमध्ये याने फक्त एकच काम हाती घेतलं. सकाळी घरात लवकर नाश्ता करायचा, दुपारचं जेवण गाडीला बांधून घ्यायचे आणि दिवसभर कळंब तालुक्यात फिरायचा. ''शेतकरी, शिक्षक, रोजंदारीवर जगणारा वर्ग, लहान मुले, शाळेतील पोर, ग्रॅज्युएशन करून रिकामटेकडा असणारा विद्यार्थीवर्ग, उदयोगपती, स्थानिक राजकारणात स्वतःचा ठसा उमटवणारे व्यक्तीमत्व सर्वांना भेटत दिवस काढायचा. हे फिरत असतानाच शेतकऱ्यांच्या अडचणी, रोजंदारीवर जगणारा वर्ग यांचं दुःख जाणून घेतले. ''घरी पैसे आहेत पण, पोरग शिकत नाही'' अश्या पालकांनाही तो भेटत राहिला.

पुणे, मंबई सारख्या शहरात आणि कळंब तालुक्यात मानवी आणि भौतिक झालेल्या विकासाची तो सतत तुलना करीत राहिला. का आपला प्रदेश सर्व गोष्टी असूनही मागास राहिला? याचा शोध घेत राहिला. ''आपला प्रदेश सुधारला पाहिजे, आपली माणस पुढं गेली पाहिजे, पोरामध्ये सर्व गुणवत्ता असूनही पुढे फार काही करू शकत नाहीत? अनेक पालक आणि विद्यार्थी न्यूनगंड यामध्ये अडकलेली असतात. याा तरुणांना जर आपण दिशा दिली तर ही भारताचं भवितव्य सुधारण्यात त्यांचा नक्कीच वाटा असेल'' असा विचार करून त्याने सहा वर्षाच्या मुलापासून ते स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी यांना घडवण्यासाठी( सुयश अकॅडमी) एक शैक्षणिक चळवळच डिसेंबरमध्ये उभी केली. याला अनेक पालक वर्गाचा पाठींबा लाभला.आज मित्तिला 150 विद्यार्थी राज याच्याकडे फक्त पुस्तकीच नाहीतर आयुष्याला पुरून उरणार शिक्षण घेत आहेत. शेकडोच्या संख्येने या रोगराईमुळे वेटिंगवर विद्यार्थी आहेत. फक्त विद्यार्थ्यांनाच फक्त मार्गदर्शन करून चालत नाही तर त्याहीपेक्षा पालकांनाच अधिक गरज असते शैक्षणिक जागृती करण्याची ही गरज ओळखून तुमच्या पाल्याना कशा प्रकारे त्याचा सामाजिक ,सांस्कृतिक,शारीरिक विकास घडवला पाहिजे याच्याही कार्यशाळा घेत आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT