पुणे

उमेदवारांना आरक्षणाचे दावे बदलण्याची संधी

CD

पुणे, ता. १७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आरक्षण, शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील माहिती अद्ययावत करण्याची संधी देण्यात आली आहे. यात सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, नॉन-क्रिमीलेअर (एनसीएल) आणि अधिवास प्रमाणपत्रासंबंधीच्या नोंदीत सुधारणा करता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी उमेदवारांना यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द करून नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

आयोगाने यासंदर्भात मंगळवारी (ता. १७) शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले. ‘एमपीएससी’तर्फे गट-क संवर्गातील विविध विभागांतील तब्बल १६ हजार ७१७ रिक्त पदांच्या भरतीसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’च्या मूळ जाहिरातीनुसार यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना सुधारित पात्रतेनुसार आणि नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी उमेदवारांना त्यांच्या अर्जातील विविध दावे अद्ययावत करता येणार आहेत.
यात सामाजिक आरक्षणाअंतर्गत जातीचा दावा अद्ययावत करता येईल. तसेच, समांतर आरक्षणाअंतर्गत महिला, खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग आणि अनाथ या प्रवर्गांशी संबंधित दाव्यांत सुधारणा करता येणार आहे. याशिवाय एनसीएल आणि अधिवास प्रमाणपत्रासंबंधीच्या नोंदीही अद्ययावत करण्याची सुविधा दिल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांनी पूर्वीचा अर्ज रद्द करण्याची आवश्यकता नाही. तसेच, मूळ जाहिरात आणि यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकांमधील अन्य अटी-शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

अर्ज रद्द न करता सुधारणा शक्य
या प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीतील ‘प्रोफाइल क्रिएशन’ विभागात जाऊन स्वतःच्या प्रोफाईलमधील संबंधित दावे अद्ययावत करावेत. त्यानंतर प्रोफाइल लॉक करून ‘माय अकाउंट’मधील ‘व्ह्यू’ पर्यायावर क्लिक करावे. तेथे ‘रिझर्व्हेशन/क्वालिफिकेशन अपडेट’ हा पर्याय उपलब्ध होईल. त्याद्वारे आवश्यक बदल करून ‘रीचेक एलिजिबिलिटी’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला सुधारित पात्रतेनुसार कोणत्या संवर्गासाठी अर्ज करता येईल, याची माहिती मिळेल. पात्र ठरणाऱ्या संवर्गासाठी अर्ज करण्याची इच्छा असल्यास ‘अप्लाय’ आणि ‘सबमिट’ या पर्यायांचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल खून खटल्याची सुनावणी चार डिसेंबरला

महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम बदलले! आता १२ वर्षांखालील मुलांना एकट्यानं प्रवेश बंद; सोसायट्यांची जबाबदारी वाढली

Paradh News : मोबाईल उघडल्या नंतरच महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या आत्महत्याचे कोढे उलगडणार.....? चार दिवसानंतर ही महाराजांच्या आत्महत्याचे गूढ कायम

Amravati News : नल-दमयंती सागर झाला अबोल! पक्षिमित्रांना लागली चिंता, दुष्काळाचे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT