MPSC member selection process continues 
पुणे

'एमपीएससी' सदस्य निवडीची प्रक्रिया सुरूच

ब्रिजमोहन पाटील

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचा घोळ शुरू असला तरी, इथला करभार देखील लालफितीमध्ये अडकलेला आहे. सध्या ‘एमपीएससी’चा कारभार केवळ अध्यक्ष व एका सदस्याच्या नियुक्तीवर सुरू आहे. उर्वरित चार सदस्य निवडीसाठी सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रक्रिया सुरू केली, पण त्यास अद्याप गती आलेली नाही. सदस्य नसल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून भरती प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला असून, अंतिम निकाल रखडले आहेत.

महाराष्ट्र शासनात अनेक विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ही भरती करण्यासाठी सरकारकडून ‘एमपीएससी’ला परवानगी दिली जाते. एमपीएससी'ही स्वायत्त संस्था असली तरी अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती सरकारच्या माध्यमातून होते. सध्या सतीश गवई हे अध्यक्ष आहेत, तर दयानंद मेश्राम हे एकमेव सदस्य आहेत. चार सदस्यांच्या जागा रिक्त आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे एकीकडे गेल्या वर्षीच्या परीक्षा लांबल्या आहेत, त्यांना आणखी उशीर होणार होता, पण विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता मार्च व एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. तसेच यापूर्वी पीएसआय, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा यांच्या परीक्षा २०१८-१९ मध्ये झाल्या आहेत. पण यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या अद्याप मुलाखती पार पडलेल्या नाहीत. भरती प्रक्रियेतील मुलाखती किंवा शारीरिक चाचणीच्या वेळेस अध्यक्ष व सदस्य यांच्यापैकी एक प्रतिनिधी तेथे उपस्थित असणे अनिवार्य आहे.  तसेच नवीन पद भरतीचे नियोजन, वेळापत्रक यामध्ये ही सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या अध्यक्ष व सदस्य हे दोघेच असल्याने त्या कामावर मर्यादा येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमपीएसीसीचे चार सदस्य निवड करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातर्फे
गस्ट महिन्यात अर्ज मागविले होते, त्यानंतर अद्याप त्याबाबत पुढे काय कार्यवाही झाली? सदस्य पदासाठी किती जणांनी अर्ज केले? त्यांची नावे कधी जाहीर होणार याबाबत माहिती मिळू शकली नाही. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.


‘‘एमपीएससी’ने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी लेखी परीक्षा घेतली,त्यात मी उत्तीर्ण झालो आहे. पण गेले वर्षभर आमची शारीरिक चाचणी व मुलाखत झालेली नाही. गेले वर्षभर फिटनेससाठी तयारी करत आहे. त्याचा खर्च देखील वाढत आहे. चार वेळा मुलाखती पुढे  
ढकलल्या. याबाबत लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच ‘एमपीएससी’ सदस्यांची नियुक्तीही लवकर व्हावी.
- भुजंग पाटील, उमेदवार

सोने खरेदीत गुंतवणुकीचं आमिष दाखवून कोटींना गंडा; पुण्यातील नामवंत सराफी पेढीकडून फसवणूक

"एमपीएससीच्या मुलाखती घेताना अध्यक्ष किंवा सदस्य उपस्थित असणे आवश्‍यक आहे. पण सध्या चार पदे रिक्त आहे. अध्यक्ष व एक सदस्यच कार्यरत आहेत. शासनाने सदस्य निवडीसाठी सुरू केलेली प्रक्रिया लवकर पूर्ण करून भरती प्रक्रियेस गती द्यावी. ’’
- मधुकर कोकाटे, माजी अध्यक्ष, एमपीएससी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT