पुणे

कऱ्हाड एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

CD

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

कऱ्हाडला तहसीलदार कार्यालयावर धडक; आयोगाच्या अध्यक्षांनी द्यावा राजीनामा


कऱ्हाड, ता. ८ ः स्पर्धा परीक्षेची तयारी करताना वर्षानुवर्षे घाम गाळणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून केली. परिसरातून स्पर्धा परीक्षार्थी व पालकांनी मोर्चा काढला.

एमपीएससीच्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र ऑडिट करून गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी मोर्चाद्वारे केली. दत्त चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, काही काळापासून विविध शासकीय भरती आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. लाखो तरुण विद्यार्थी अहोरात्र मेहनत करून आर्थिक परिस्थिती नसली तरी कर्ज काढून परीक्षांची तयारी करतात. मात्र, परीक्षेच्या ऐनवेळी किंवा निकालानंतर पेपर फुटल्याचे समोर येते. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यांच्यात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात साधारण ३५ लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व इतर शासकीय भरतीसाठी प्रयत्न करतात. या विद्यार्थ्यांत बहुतांश विद्यार्थी शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात; परंतु स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे या लाखो युवकांच्या भवितव्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
सगळ्या परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आदेश पारीत करावे, पेपर फुटल्यामुळे रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, पुढील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा या मोफत पद्धतीने घेण्यात याव्यात, अशा मागण्याही केल्या.


...........
विद्यार्थ्यांच्या मागण्या

- पेपरफुटी व शासन भरतीतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी.
- एसआयटीची विशेष तपास पथकाची नेमणूक करावी.
- सीबीआयमार्फत चौकशी करून सर्व दोषींना अटक करावी.
- पेपरफुटी, शासन भरती गैरव्यवहारांतील दोषींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई व्हावी.
- दोषींच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करणारा कडक कायदा तत्काळ लागू करावा.
- पेपरफुटी, शासकीय भरती गैरव्यवहाराच्या सुनावणीला फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करावी.

W48157
कऱ्हाड ः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक, युवतींनी एकत्रित येत मंगळवारी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT