पुणे

गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला ‘पीएसआय’ पदाच्या भरती प्रक्रियेत ‘एमपीएससी’चा ढिसाळ कारभार

CD

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १० ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब (अराजपत्रित) २०२५’ परीक्षेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या भरती प्रक्रियेला विलंबाचे ग्रहण लागले आहे. मुख्य परीक्षा होऊन तीन महिने उलटले, अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊनही जवळपास दोन महिने होत आले, तरी सर्वसाधारण गुणवत्ता यादी (जीएमएल) जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दोन महिन्यांत निकाल लावण्याच्या आयोगाच्या अध्यक्षांची आश्‍वासने हवेतच विरली आहेत. यासंदर्भात आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आयोगातर्फे २९ जुलै २०२५ रोजी पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली पूर्व परीक्षा दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली. त्यानंतर २३ मार्च रोजी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि १७ मे रोजी मुख्य परीक्षा पार पडली. त्यानंतर २७ मे रोजी प्रथम उत्तरतालिका, तर १७ जून रोजी अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम उत्तरतालिकेनंतर निकालाची प्रक्रिया पूर्ण करून लवकरच सर्वसाधारण गुणवत्ता यादी (जीएमएल) जाहीर होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप ‘जीएमएल’ जाहीर झालेली नाही. त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर ‘जीएमएल’ जाहीर करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात विद्यार्थी म्हणाले, ‘‘अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांच्या आत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित असते. १७ मे रोजी मुख्य परीक्षा पार पडल्यानंतर आयोगाने प्रथम व द्वितीय उत्तरतालिका विक्रमी वेळेत प्रसिद्ध केली होती. त्यामुळे निकालही लवकर लागेल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, १७ जून रोजी अंतिम उत्तरतालिका येऊनही आजतागायत गुणवत्ता यादीचा पत्ता नाही. धक्कादायक बाब म्हणजे, पूर्व परीक्षेची जाहिरात येऊन एक वर्ष पूर्ण झाले, तरीही प्रक्रियेचे गाडे रखडलेलेच आहे. ’’
----------------------
वर्षभराचा परीक्षा प्रवास
२९ जुलै २०२५ : गट-ब २०२५ पूर्व परीक्षेची जाहिरात
९ नोव्हेंबर २०२५ : नियोजित पूर्व परीक्षा; परीक्षा पुढे ढकलली
४ जानेवारी २०२६ : पूर्व परीक्षा
२३ मार्च २०२६ : पूर्व परीक्षेचा निकाल
७ एप्रिल २०२६ : मुख्य परीक्षेची जाहिरात
१७ मे २०२६ : मुख्य परीक्षा
२७ मे २०२६ : प्रथम उत्तरतालिका
१७ जून २०२६ : अंतिम उत्तरतालिका
१० ऑगस्ट २०२६ : सर्वसाधारण गुणवत्ता यादीची प्रतीक्षा
----------------------
‘‘आम्ही नेमकी कोणत्या टप्प्यासाठी तयारी करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य परीक्षा होऊन दोन महिने होत आले तरी ‘जीएमएल’ जाहीर होत नसेल, तर विद्यार्थ्यांनी पुढील टप्प्याची तयारी कशी करावी? गुणवत्ता यादी लवकर जाहीर झाली तर पात्र विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीसाठी योग्य नियोजन करता येईल.’’
- प्रथमेश निकते, विद्यार्थी
--------------------
‘‘पीएसआयसाठी मैदानी चाचणीला खूप मेहनत आणि वेळ लागतो पण आमचे नाव गुणवत्ता यादीत आहे की नाही, हेच माहीत नसल्याने रोज सकाळी मैदानावर जायचे की वाचनालयात, हाच मोठा संभ्रम आहे.’’
- अभिजित पाताडे, विद्यार्थी
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT