Darshana Pawar Murder Case Sakal
पुणे

Post Viral : "बाप मिटमिट डोळ्यांनी पाहतोय फक्त"; अधिकारी होताच खून, काळीज पिळवटून टाकणारी दर्शनाची गोष्ट

ससून मधून रात्री उशिरा निघताना अचानक लक्षात आलं की आज फादर्स डे आहे आणि बाप थंड झालेल्या चहाचा कप आणि फोडलेल्या बिस्किट पुड्यातलं एकही बिस्किट न खाता येणाऱ्या जाणाऱ्याकडे फक्त मिटमीट डोळ्याने पाहतोय….

दत्ता लवांडे

MPSC परिक्षेत यश संपादन केल्याच्या काही दिवसांतच एका तरूणीचा पुण्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळून आला. दर्शना पवार असं मृत तरूणीचे नाव असून तिचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण ही दुर्दैवी घटना काळजाला हात घालणारी आहे. सध्या दर्शनाच्या गूढ मृत्यूवरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यापैकी काळजाला हात घालणारी ही व्हायरल झालेली पोस्ट.

जेव्हापासून ही बातमी कानावर आलिय मी एकदम सुन्न आहे. तिथे गेल्यागेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा. एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं?

वडील साधे ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने. दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला ९५%, बारावीला ९८%,गणित विषयाची पदवीधर, कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला UPSC ची तयारी करत होती. पहिल्या दीड वर्षात बऱ्यापैकी syllabus नोट्स सहित पूर्ण केलेला आणि अचानक रूम मधून पुस्तके नोट्स चोरीला गेल्या.

खचलेल्या दर्शनाला आता नेमकं काय करायचं कळत नव्हत तितक्यात MPSC च्या RFO परिक्षेची जाहिरात सुटल्याचं तिच्या लक्षात आलं. त्वरित अभ्यास सुरु केला पूर्व परीक्षा पास झाली मुख्य ही पास झाली आणि विशेष म्हणजे हा सगळा अभ्यास तिने गावी केला होता. मुलाखतीच्या तयारीसाठी ती काही वेळ पूण्यात होती मुलाखतीचा टप्पा सुद्धा यशस्वीपणे पार पाडून लागलेल्या निकालात तीची RFO पदावर निवड झाली होती.

तिचा संघर्ष सांगताना कित्यकांचे डोळे पाणावले.गावात मिरवणूक निघाली कित्येक ठिकाणी सत्कार झाले आणि या सगळ्यात दर्शना व तिच्या घरातले खुश होते. पण अचानक हे घडलय.घरातले अजून धक्क्यात आहेत ही सापडलेली मुलगी आपली नाहीय हे त्यांना सतत वाटतंय पण दुर्दैवाने ती दर्शनाच आहे. हे नेमकं काय झालंय हे पोलीस तपासात उघड होईलच पण दीदींनो जपा स्वतःला, नका ठेऊ एखाद्यावर सहज विश्वास. थोडा वेळ जाऊद्या..

घरातल्यांसोबत सतत संवाद ठेवा जे जे काही वाटतय ते शेयर करत जा. आणि दादांनो दीदींनो दोघांनाही सांगतो राग आलाय तर ओरडा, चीडा हव असल्यास मर्यादा ओलांडून वाट्टेल ते बोला. माणूस दुखावेल आणि काही दिवसांनी शांत होईल पण दोघांचं आयुष्य सुखरुप राहील.

ससून मधून रात्री उशिरा निघताना अचानक लक्षात आलं की आज फादर्स डे आहे आणि बाप थंड झालेल्या चहाचा कप आणि फोडलेल्या बिस्किट पुड्यातलं एकही बिस्किट न खाता येणाऱ्या जाणाऱ्याकडे फक्त मिटमीट डोळ्याने पाहतोय….

ईश्वरा आपण माणूस आहोत याचा विसर पडू देऊ नकोस रे कोणाला…..

भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

दर्शना पवार.

RFO, महाराष्ट्र राज्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT