mrudgandh karandak 2023 won rn agarwal technical high school farmer agriculture Sakal
पुणे

Baramati News : मृदगंध 2023 करंडकावर आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलने कोरले नाव...

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून मृदगंध विविध गुणदर्शन स्पर्धा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतली जाते

मिलिंद संगई, बारामती

बारामती - येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृदगंध 2023 विविध गुणदर्शन स्पर्धेत राधेशाम एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल यांनी सादर केलेल्या शेतकरी जगाचा पोशिंदा या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून मृदगंध विविध गुणदर्शन स्पर्धा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतली जाते. यंदा 21 शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने सादर केलेल्या निसर्ग माझा गुरु या नाटिकेस द्वितीय तर विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या ओझे अभ्यासाचे की अपेक्षांचे या नाटिकेस तृतीय क्रमांक मिळाला.

म.ए.सो.चे ग.भि. देशपांडे विदयालय (बाय बाय प्लॅस्टिक), विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर (ओझे अपेक्षांचे की अभ्यासाचे) व विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, सुपे यांना उत्तेजानार्थ पारितोषिके प्रदान केली गेली.

या स्पर्धेतील इतर पारितोषिके पुढील प्रमाणे- उत्कृष्ट अभिनय पुरुष- शौर्य़ देवकाते (अनंतराव पवार शाळा), उत्कृष्ट अभिनय महिला- यशोधरा खरात (आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल), अभिनय उत्तेजनार्थ पुरुष- वेदांत घाडगे (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय), यश दरडे (विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर),

अभिनय उत्तेजनार्थ महिला- मनस्वी चव्हाण (सायरस पूनावाला सीबीएसई), उत्तरा रणवरे (विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम सीबीएसई), उत्कृष्ठ नेपथ्य- कोमल बोराटे (झैनुबिया इंग्लिश मिडीयम स्कूल), सर्वोत्कृष्ट लेखन विभागून- रवींद्र गडकर व एस.आर. गाडेकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- मीना ढाकाळकर (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा), नाविन्यपूर्ण प्रयोगाचे विशेष पारितोषिक- रॅप- विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यमिक शाळा, इंदापूर

सुप्रसिध्द अभिनेत्री शर्वरी जमेनिस, एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अँड. नीलीमा गुजर तसेच परिक्षक गजानन भिसे, संजय जोशी व हर्षदा अभ्यंकर, संस्थेचे रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविकात फोरमच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. 23, 24 व 25 डिसेंबर रोजी बारामती फेस्टीव्हलचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.

गजानन भिसे, संजय जोशी व हर्षदा अभ्यंकर परिक्षक म्हणून परिक्षण केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अँड. अमरेंद्र महाडीक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Pune News : विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Latest Marathi News Live Update : माणुसकीची भिंत २०२५ उपक्रमाची सुरुवात

SCROLL FOR NEXT