पुणे, ता. २३ : डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’च्या (एमकेसीएल) ‘एमएससीआयटी’ उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील मानाचा ‘स्कॉच’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
देशातील सुशासन आणि डिजिटल परिवर्तनाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. गेल्या २५ वर्षांत ‘एमएससीआयटी’ने राज्यातील कोट्यवधी नागरिकांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचे काम केले आहे. या यशाबद्दल बोलताना ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे म्हणाले, ‘‘हा सन्मान विद्यार्थी, पालक, केंद्रप्रमुख आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. यातून महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे.’’
अभ्यासक्रमात ‘एआय’चा समावेश :
राज्यातील पाच हजारांहून अधिक केंद्रांद्वारे ग्रामीण व शहरी भागात संगणक शिक्षण पोहोचले आहे. बदलत्या काळानुसार ‘एमएससीआयटी’च्या अभ्यासक्रमात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश केला आहे. या पुरस्कारामुळे डिजिटल साक्षरतेच्या मोहिमेला नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास ‘एमकेसीएल’ने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.