MSEB engineer beaten in Bhosari for sending message on Whatsapp to woman
MSEB engineer beaten in Bhosari for sending message on Whatsapp to woman 
पुणे

भोसरी : महिलेला व्हॉट्‌सऍप मेसेज अन् कॉल केल्याने महावितरणच्या अभियंत्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भोसरीमध्ये फोन करण्यासह व्हॉट्‌सऍपवर मेसेज केल्याने महिलेसह तिच्या पतीने व भावाने महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी विक्रांत माधव वरुडे (रा. तुकाईनगर, दिघी रोड, भोसरी) या अधिकाऱ्याने फिर्याद दिली. त्यानुसार वैशाली भालेकर, तिचा पती व भाऊ ज्ञानेश्‍वर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वरुडे हे महावितरण कंपनीत सहायक अभियंता म्हणून नोकरीला आहेत. शुक्रवारी (ता. 6) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते थरमॅक्‍स चौकातील आकुर्डी उपविभाग कार्यालयात होते. त्या वेळी भालेकर व जाधव कार्यालयात आले. "माझ्या बायकोला फोन व व्हॉट्‌सऍप मेसेज का करतो', असे म्हणत वरुडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून मोशीतील कार्यालयात आणले. तेथे वैशाली भालेकर यांनी वरुडे यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी हे वरुडे यांच्या घरी घेऊन गेले. तेथे त्यांच्या आई व वहिनीसमोर पुन्हा त्यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT