MSEDCL Cut power supply vishrambaug wada PMC Due electricity Bill 
पुणे

विश्रामबाग वाडा अंधारात; पुणे महापालिकेने वीजबिलच भरले नाही

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेने विश्रामबाग वाड्याचे बिल न भरल्याने महावितरण कंपनीने एकाच आठवड्यात सलग दुसऱ्या वेळी वीज तोडली. पुण्यातील पर्यटनाचे आकर्षण स्थळ असलेला हा वाडा त्यामुळे अंधार पसरला. पुणे महापालिच्या विद्युत विभागाकडून शहरातील सर्व कार्यालये, नाट्यगृह, उद्यान, ऐतिहासिक वास्तू, पथदिवे, विविध प्रकल्प येथील वीजबिल भरले जाते. त्यासाठीची व्यवस्था तयार केली गेलेली आहे. दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिका यावर करते. तरीही विद्युत विभागातील अभियंत्यांकडून वीज बिल भरले जात नसल्याने लाखो रुपयांची थकबाकी पडून आहे.

महावितरणच्या पर्वती विभागाअंतर्गत मंडई, स्वारगेट, धायरी येथे महापालिकेच्या विविध इमारतींची सुमारे ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. मंडईच्या अंतर्गत विश्रामबाग  वाडा व इतर तीन ठिकाणची सुमारे ६ लाखाची थकबाकी आहे. महापालिकेने हे पैसे भरावेत यासाठी महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून पाठपुरावा सुरू होता, परंतु वेळेत पैसे न मिळाल्याने १९ मार्चरोजी विश्रामबाग वाड्याची वीज तोडण्यात आली. पैसे भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा वीज जोडण्यात आली. पण अद्याप पैस न मिळाल्याने आज (ता. २३) पुन्हा एकदा वीज तोडण्यात आली आहे. याच प्रमाणे दत्तवाडीतील शाळा क्रमांक ८०ची सुमारे २ लाखाची थकबाकी असल्याने तेथील वीज पुरवठा खंडित केला आहे. वीज तोडल्यानंतर जागे झालेल्या विद्युत विभागाने उद्याच पैसे भरतो असे सांगून वीज चालू करावी यासाठी महावितरणकडे विनंती केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्वती विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. दराडे म्हणाले ‘‘गेल्या पाच महिन्यांपासून पर्वती विभागातील विविध ठिकाणचे सुमारे ५० लाखाची महापालिकेची थकबाकी आहे. १ मार्चपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. शुक्रवारी विश्रामबाग वाड्याची वीज तोडली होती. महापालिकेने विनंती केल्याने पुन्हा वीज तोडली. मात्र, अद्याप पैसे न भरल्याने वीज पुरवठा खंडित केला आहे.’’


''महापालिकेकडून वेळेवर बिल भरले जाते, परंतु या ठिकाणचे बिल का भरले जात नाही याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल. विश्रामबाग वाडा, दत्तवाडीतील शाळेची वीज सुरू करण्याची विनंती महावितरणला केली आहे.''
- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, महापालिका

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT