परिमंडळ महावितरण sakal
पुणे

बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

बारामती तालुक्यात पारवडी गावात आकडा टाकण्यास मनाई केल्याच्या कारणाने आज तिघांनी महावितरण कंपनीच्या वायरमनला जबर मारहाण केली व त्यांनी शासकिय कामात आडथळ आणण्याचा प्रय़त्न केला

कल्याण पाचंगणे

माळेगाव : बारामती तालुक्यात पारवडी गावात आकडा टाकण्यास मनाई केल्याच्या कारणाने आज तिघांनी महावितरण कंपनीच्या वायरमनला जबर मारहाण केली व त्यांनी शासकिय कामात आडथळ आणण्याचा प्रय़त्न केला. त्यामध्ये आस्लम मन्यार (पुर्ण नाव पत्ता माहित नाही ), सोमनाथ हनुमंत जगताप ( रा. सावळ ता. बारामती)  व एका अनोळखी इसमाचा समावेश आहे. त्या प्रकरणी प्रमोद शिवाजी नांगरे (वय २५, धंदा नोकरी- महावितरण कंपनी, बारामती) यांनी तालुका पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध फिर्य़ाद दिली.

"सावळ येथील आटोळेवस्ती परिसरात विजबिल थकबाकी वसुली करणे कामी गेलो होतो. त्या ठिकाणी इलेक्ट्रीक पोलवर आनाधिकृतपणे दोन आकडे टाकुन वीज वापर चालु असल्याने वरील लोकांना अटकाव केला. परंतु त्यांनी मला मारहाण केली व शासकिय कामात अडथळा आणला. त्यामुळे आस्लम मन्यार, सोमनाथ हनुमंत जगताप व एका अनोळखी इसमांविरुद्ध मी तक्रार देत आहे" असे नांगरे यांनी फिर्यादिमध्ये नमूद केले आहे.

त्यानुसार पोलिसांनी संबंधित संशयित आरोपींविरुद्ध तालुका पोलिसांनी मारहाण करून जखमी करणे, शासकिय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, वीजेची चोरी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार शिंगाडे वरील प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China LAC Face-off : डोकलामनंतर पुन्हा अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवर तणाव? आयटीबीपी महासंचालकांचा मोठा खुलासा

Gokul Election Expenses : 'गोकुळ'च्या निवडणुकीत लाखो रुपयांची उधळण! नेमका पैसा कुठे खर्च झाला? आकडा वाचून व्हाल थक्क

IND A vs NZ A Squad : भारताच्या कसोटी संघात बदल, झारखंडच्या २१ वर्षीय खेळाडूची एन्ट्री; न्यूझीलंडनेही जाहीर केले ३ वेगवेगळे संघ...

Marathi News Live Updates: आधी कारने धडक दिली, रस्त्यावर पडताच लोखंडी रॉडने चेहऱ्यावर वार करत मित्रानेच केला बंटी दीक्षितचा निर्घृण खून

Maharashtra Schools: दिवाळीआधी शाळा होणार चकाचक; ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत, शिक्षण विभागाकडून निर्देश

SCROLL FOR NEXT