पुणे

पुणे-दौंड लोहमार्गावर बहुप्रतिक्षित मेमू धावली

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन : पुणे-दौंड लोहमार्गावर सुमारे पस्तीस वर्षापासूनची बहुप्रतिक्षित मेमू (मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) लोकलची मागणी होती. त्या मागणीला यश मिळाले असून गुरुवारी (ता. 08) सकळी लोकल मेमू सुरू झाली. भाजपा व राष्ट्रवादी या पक्षांच्या श्रेय वादाच्या पार्श्वभूमीवर आज उरुळी रेल्वे स्टेशन येथे सर्वसामान्य नागरिकांनी या मेमूचे केलेले स्वागत महत्त्वाचे ठरले आहे.

उरुळी रेल्वे स्टेशन वर प्रवाशांना रेल्वेकडून सुविधा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या प्रयागधाम ट्रस्टच्या महात्माजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी पुण्याहून दौंडकडे जाणाऱ्या 'मेमू'चे उरुळी स्टेशनवर चालकांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सन्मान केला. यावेळी महात्माजी अनमोल रामानंद, योग रामानंदजी, मनोज बजाज, स्टेशन मॅनेजर एम. एस. माने व मोहन सालोडकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

या इलेक्ट्रिक लोकल मेमूच्या दौंडवरून पुण्याकडे दोन फेऱ्या तर पुण्यावरून दौंडकडे दोन फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर  सुरु करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी या मार्गावर १९७६ ते २०१९ या काळात पुणे-दौंड शटल सेवा (साधी पॅसेंजर) सुरू करण्यात आली होती, मात्र  प्रवाशांची मागणी असतानाही तांत्रिक अडचणीमुळे इलेक्ट्रिक लोकल मेमू सुरू होत नव्हती. रेल्वे खात्याने अडीच वर्षांपूर्वी डिझेलवर चालणारी डेमो (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) चालू करण्यात आली होती. 

दरम्यान, डेमू लोकलच्या फेऱ्या आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. या डेमूमुळे प्रत्येक स्थानकावर थांबूनही या रेल्वे गाडीचा वेग चांगला असल्यामुळे वेळेची बचत होत होती. त्याच धर्तीवर आजपासून सुरू झालेल्या इलेक्ट्रिक लोकल मेमूमुळे हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, पाटस व दौंड या भागातील प्रवाशांना दौंड पुणे प्रवास करण्यासाठी कमी वेळ लागणार असून प्रवासात बसण्याच्या जागेचीही उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार आहे. भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या लोकलच्या फेऱ्यांमध्ये  वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या इलेक्ट्रिक लोकल मेमूमुळे डिझेलची व वेळेची बचत होणार असून, पर्यावरणाची हानी टळणार आहे. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा-पुणे-दौंड-पुणे दरम्यान असणाऱ्या घोरपडी,  हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस व दौंड येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे. वाढत्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याने ही रेल्वे सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT