पुणे

निसर्गातील स्थापत्यविशारदाची वंशवृद्धीसाठी धडपड! चिखलातून उभारते मडक्याच्या आकाराचे सुबक घर; कुंभारिण माशीची जीवनचक्रातील अनोखी कुंभार कामाची किमया

CD

TVS26A00245
आपल्या अनोख्या काैशल्याने चिखलापासून घरटे साकारणारी कुंभारीण माशी.
---
निसर्गातील स्थापत्यविशारदाची वंशवृद्धीसाठी धडपड!
कुंभारीण माशी चिखलातून उभारते मडक्याच्या आकाराचे सुबक घरकुल
पांडुरंग सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. ५ : निसर्गातील प्रत्येक जिवाची जगण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण असते. अगदी छोट्या कीटकांमध्येही नियोजन, कौशल्य आणि पुढील पिढीच्या सुरक्षिततेसाठीची धडपड पाहायला मिळते. चिखलाचा वापर करून मडक्यासारखे सुबक घरटे तयार करणारी कुंभारीण माशी सध्या वंशवृद्धीसाठी सक्रिय झाली आहे. घरट्याची निर्मिती, अंडी घालणे, अळीसाठी अन्नाची व्यवस्था आणि प्रवेशद्वार बंद करण्यापर्यंतची तिची कार्यपद्धती निसर्गातील स्थापत्यकलेचा अनोखा नमुना ठरते.
कुंभारीण माशीला इंग्रजीत ‘मड डॉबर’ किंवा ‘पॉटर वास्प’ असे म्हणतात. काही जातींच्या माद्या ओलसर मातीचे छोटे गोळे आणून त्यापासून मडक्याच्या आकाराचे घरटे तयार करतात. घरट्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या माशीला कुंभारीण माशी हे नाव पडले आहे.
---
चिखलातून उभारते सुरक्षित घरटे
घरट्याच्या बांधकामासाठी ही माशी ओलसर माती किंवा चिखलाचा वापर करते. चिखलाचे छोटे-छोटे गोळे जोडून ती घरट्याला मडक्यासारखा आकार देते. त्यामध्ये अंडी घातल्यानंतर अळीच्या वाढीसाठी अन्नाची व्यवस्था केली जाते. काही जातींच्या माद्या घरट्यात लहान कीटक किंवा कोळी ठेवतात. अळी त्यावर उपजीविका करून वाढते. त्यानंतर घरट्याचे प्रवेशद्वार बंद केले जाते. त्यामुळे अळीच्या सुरक्षित वाढीसाठी आवश्यक व्यवस्था होते.
---
अंड्यापासून प्रौढ माशीपर्यंतचा प्रवास
कुंभारीण माशीच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी घरट्यात उपलब्ध असलेल्या अन्नावर वाढते. पूर्ण वाढ झाल्यानंतर ती कोशावस्थेत जाते. या काळात शरीरात बदल होऊन पंख, पाय आणि इतर अवयव विकसित होतात. त्यानंतर पूर्ण वाढ झालेली माशी घरट्यातून बाहेर पडते. अशा प्रकारे पुढील पिढीच्या निर्मितीसाठी मादीने केलेली पूर्वतयारी निसर्गातील जीवनसंघर्षाची जाणीव करून देते.
---
चाैकट
निसर्गाचे निरीक्षण आणि संवर्धन गरजेचे
आकाराने लहान असले तरी प्रत्येक कीटक परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे अशा कीटकांचे निरीक्षण करताना त्यांच्या घरट्यांना हानी पोचवू नये. निसर्गातील जैवविविधतेचे महत्त्व समजून घेऊन तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
---
कोट
निसर्गात आपल्याला चकित करणाऱ्या अनेक घटना दडलेल्या असतात. त्यांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपण विचारात पडतो. अशा घटनांचे अवलोकन करून निसर्गाशी समरस होणे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मुलांनाही निसर्गाची ओळख करून देऊन त्यांच्यामध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे.
- डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक, अकलूज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तिरंगा फडकवणे गुन्हा मानला जाऊ नये - आशुतोष रांका

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT