ganesh-lake-pradhikaran 
पुणे

प्राधिकरणातील गणेश तलावात गाळ

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - प्राधिकरणातील गणेश तलावात साठलेल्या गाळाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून तलावात शेवाळही साचले आहे. याची तातडीने सफाई करण्याची आवश्‍यकता आहे. 

प्राधिकरणातील गणेश तलावाच्या अडीच एकर परिसरात गर्द झाडी आहे. त्यामुळे रोज सकाळी परिसरातील नागरिक तेथे फिरायला येतात. सुमारे १८ एकर जागेचा हा परिसरात नयनरम्य आहे. तलावाच्या एका बाजूने फिरता येते. दुसऱ्या बाजूने तलावाकडे जाण्याचा रस्ता असून उर्वरित दोन बाजू बंदिस्त आहेत.

निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे येथे कधी न दिसणारे पक्षीही दिसू लागले आहेत. या तलावातून संत ज्ञानेश्‍वर उद्यान, संत तुकाराम उद्यान आणि गजानन महाराज उद्यानाला पाणीपुरवठा केला जात  होता. संत ज्ञानेश्‍वर उद्यानाला मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच नजीकच्या काळात या प्रकल्पातून संत तुकाराम आणि गजानन महाराज उद्यानालाही पाणीपुरवठा सुरू करण्यात करण्यात येणार आहे. 

उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी कमी झाल्याने हा गाळ दिसू लागला आहे. तलावातील गाळ काढल्यास आणि तेथे पाण्याची सोय केल्यास तेथे बोटिंगची व्यवस्था करता येईल.

बोटिंग सुरू करणे शक्य नाही - कांबळे
यासंदर्भात उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे म्हणाले, ‘‘तलावाचा कोपऱ्यातील १२ फूट भाग वगळता उर्वरित भाग उथळ आहे. त्यामुळे सध्या तरी तेथे बोटिंग सुरू करणे शक्य नाही.’’

महापालिकेने मध्यंतरी तलावातील गाळ काढला होता. परंतु, तो पूर्णपणे काढला गेला नाही. गाळ पूर्णपणे काढण्याची सूचना प्रशासनाला करणार आहे. 
- अमित गावडे, नगरसेवक, महापालिका

दोन बोटींच्या साहाय्याने तलावातील वेली काढल्या. आकुर्डीच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पातून तलावात येणारे पाणी गाळ काढण्यासाठी बंद केले आहे. दोन दिवसांत गाळ काढण्यास सुरवात होईल. १५ दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- संजय कांबळे, कार्यकारी अभियंता, उद्यान विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT