mukhyamantri mazi ladki bahan yojana 2024 online apply 100 applications have been received on first day in Pune district  
पुणे

Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण’चे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात; पुणे जिल्ह्यात पहिल्याच दिवशी मिळाले 'इतके' अर्ज

mukhyamantri mazi ladki bahan yojana 2024 : राज्यातील २१ ते ६० वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना नुकतीच सुरु करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १ : राज्य सरकारच्या वतीने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी यंदापासून सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून (ता.१) सुरुवात झाली आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेचे अर्ज स्वीकारण्याचा प्रारंभ करण्यात आला.

या अर्ज स्वीकारण्यास राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत आज आशा पातोंड व स्नेहलता यनभर या दोन महिलांचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

राज्यातील २१ ते ६० वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना नुकतीच सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा प्रत्येकी १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे संबंधित महिलेच्याच थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. राज्य सरकार समाजहिताच्या अनेक योजना राबवीत असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक पात्र महिलांना फायदा होईल, असे मत महाजन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार

महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेतर्फे या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी १०० पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. यासाठी पात्र असलेल्या महिलांना येत्या १५ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : नवी दिल्लीत 'दहशतवादविरोधी परिषद-२०२५' चे उद्घाटन

Viral Video: ''ले बेटा.. किरीश का सुनेगा गाना'', तुम्ही व्हिडीओ बघितला का? कोण आहे तो व्हायरल बॉय?

Akola Political : अकोल्यात भाजप व काँग्रेसची ‘बार्गेनिंग’ वाढली; फॉर्म्युला ठरेना; उमेदवारांची धाकधुक वाढली!

Dream Job Loss: अपयश नाही, नवी संधी! स्वप्नातील नोकरी गेल्यावर नव्याने सुरुवात कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT