पुणे

हिंगणगाव-खामगाव टेक पुलाची उंची वाढविण्याची मागणी

CD

उरुळी कांचन, ता. १६ ः हिंगणगाव-खामगाव टेक येथे मुळा-मुठा नदीवर सुरू असलेल्या पुलाची उंची वाढविण्याची या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे. जुलै महिन्यात या पुलाचे गर्डर पुराच्या पाण्याने खाली पडून वाहून जाण्याची घटना घडल्याने या पुलाच्या कामाबाबत नागरिकांच्या मनात नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर त्याची उंची वाढवण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
हवेली तालुक्यातील हिंगणगाव - खामगाव टेक मुळा - मुठा नदीवरील चालू असलेल्या पुलाच्या कामाबाबत ८ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन मुख्य अभियंता भालकर व यांत्रिकी विभागाचे अधिकारी तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह हिंगणगाव, खामगावटेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील पदाधिकारी यांच्या समवेत पुलाच्या जागेची पाहणी केली होती. सर्व्हे करून डिझाईन बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तथापि दाखवलेल्या उंचीपेक्षा पाच फूट कमी उंचीचा पूल याठिकाणी बांधण्याचे काम सुरू असल्याचे जुलै २०२६ मध्ये आलेल्या पुरामुळे लक्षात आले. गर्डर पुराच्या पाण्याने वाहून गेले, याचे मुख्य कारण पुलाचे डिझाईन करताना पुराच्या पाण्याची अधिकतम उंची सुमारे ५ फुटांनी कमी धरली गेली. याचा परिणाम कमी उंचीच्या पुरात गर्डर पडून नुकसान झाले. हिंगणगाव व खामगावटेक या दोन्ही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव मंजूर करून, या नव्याने बांधल्या जात असलेल्या पुलाची उंची ७ ते ८ फूट वाढवावी, अशी लेखी मागणी असलेले निवेदन नुकतेच पीएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता स्नेहा हब्बू यांच्याकडे देत दोन्ही गावच्या आजी माजी सरपंचासह भेटलेल्या शिष्टमंडळाने केली, तसेच उंची वाढवण्याचा निर्णय होईपर्यंत काम थांबवावे अशी सूचना शिष्टमंडळाने केली. या प्रसंगी माजी सरपंच अंकुश कोतवाल, प्रेमजी थोरात, बाळासाहेब थोरात, सत्यवान गायकवाड, बाबा थोरात, बाळू थोरात आदी उपस्थित होते.
याबाबत लवकरच मिटींग घेऊन निर्णय कळवू अशी माहिती कार्यकारी अभियंता हब्बू यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

25 Years Of Seva: पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रसेवेची २५ वर्षे पूर्ण; मुख्यमंत्र्यांनी उत्तरकाशीच्या काशी विश्वनाथ मंदिरात केली विशेष पूजा!

Ujani Dam: दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांना गुड न्यूज! मंद्रूपसह ६ तलावांत उजनीचे पाणी पोहोचले; पाणीटंचाईला मोठा दिलासा

Gautam Gambhir Post For Ajit Agarkar: प्रिय अजित भाई...! गौतम गंभीरची पोस्ट; अजित आगरकरचे कौतुक करताना साधला निशाणा

RBI Governor Inflation: साखर-कांद्याने वाढवली महागाईची चिंता! दिवाळीत महागाई वाढणार? RBIचा मोठा इशारा

कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; मुलगी सामायराही सोबत; फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT