Drinking Water  esakal
पुणे

Pune Water : मुळशीतील नागरिकांना पिण्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे

मुळशीतील नागरिकांना पिण्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुळशीतील नागरिकांना पिण्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नऊ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

मुळशीतील सामाजिक कार्यकर्ते अमित कंधारे यांनी ॲड. कृष्णा मोरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुळशीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टाटा पॉवर कंपनीने किमान एक टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे.

या पाण्यामुळे सुमारे ५० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल असे याचिकेत नमूद आहे. १९१५-२७ दरम्यान मावळ-मुळशी तालुक्यात मुळशी, लोणावळा, वळवण , शिरोटा, कुंडली आणि ठोकरवाडी अशी सहा धरणे बांधण्यात आली आहेत. ही धरणे सध्या टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यात असून, तेथे वीजनिर्मिती केली जाते.

शतकापूर्वी टाटा पॉवर कंपनीने भिरा, भिवपुरी आणि खोपोली येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभे केले. यासाठी टाटा कंपनीने पश्चिम बाजूचे पाणी हे भिरा, भिवपुरी आणि खोपोली या जलविद्युत केंद्रांकडे वळविले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मावळ-मुळशी तालुक्यातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे याचिकेत नमूद आहे. मुळशी धरणातील पाणी हे मुळशीतील २४ गावे, हिंजवडीतील १३ गावे आणि कोळवणमधील ११ गावांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्टेट वॉटर पॉलिसी, २०१९ अनुसार पिण्याच्या पाण्याला राज्य सरकारने वीजनिर्मिती व उद्योग धंद्यांना लागणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. वाढत्या लोकसंख्येला अनुसरून टाटाने एक टीएमसी पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

- ॲड. कृष्णा मोरे, याचिकाकर्त्यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT