माले, ता. ९ : मुळशी तालुक्यातील निवे (ता. मुळशी) येथील प्लस व्हॅली परिसरातील मिल्कीबार वॉटरफॉल पाहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. धबधबा पाहून परतत असताना शॉर्टकटचा मार्ग निवडणे या तरुणाच्या जीवावर बेतले. साहीद अंसारी (वय २०, सध्या रा. ताथवडे, मुळगाव बैकटपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार) असे मृत तरुणाचे नाव आहे.
साहीद हा आपल्या चार मित्रांसह प्लस व्हॅली येथे फिरण्यासाठी गेला होता. धबधबा पाहिल्यानंतर परतत असताना त्यांनी नेहमीच्या पायवाटेने न जाता शॉर्टकटचा मार्ग निवडला. या वेळी सुमारे ४५ अंश तीव्र उतार असलेल्या डोंगराळ भागातून चढाई करत असताना साहीदचा अचानक पाय घसरला. त्यामुळे तो अंदाजे २०० मीटर खोल दरीत कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रोहा रेस्क्यू टीम, एस.व्ही.आर.एस.एस. आणि पौड पोलिस ठाण्याच्या पथकाने समन्वयाने बचावकार्य सुरू केले. दुर्गम आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर तांत्रिक कौशल्याचा वापर करून रोप रेस्क्यूच्या साहाय्याने दरीतून मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.
शॉर्टकटचा वापर टाळावा
या दुर्दैवी घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पर्यटकांनी अतिउत्साह दाखवू नये, धोकादायक शॉर्टकटचा वापर टाळावा आणि पर्यटनस्थळी निश्चित केलेल्या नियमित मार्गानेच प्रवास करावा, असे आवाहन पौड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश मेश्राम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.