पुणे

मुळशीचा निकाल ९७.१४ टक्के

CD

पौड, ता. २५ : इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मुळशी तालुक्याचा निकाल ९७.१४ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये यावेळीही मुलींनीच बाजी मारली. तालुक्यातील विविध शाळांतील नऊ शाखांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
मुळशी तालुक्यात पौड, पिरंगुट, भूगाव, हिंजवडी, कासारआंबोली, ताथवडे, मारूंजी, भांबर्डे, उरवडे, बावधन, माण या अकरा ठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे बारावीचे वर्ग आहेत. तर पौड, पिरंगुट, बावधनला व्यवसाय अभ्यासक्रमाचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व शाळांमधून १५८१ विद्यार्थी आणि १२९६ विद्यार्थिनी, असे एकूण २८७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १५२० विद्यार्थी आणि १२७५ विद्यार्थिनी, असे एकूण २७९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण ९६.१४ टक्के; तर मुलींचे प्रमाण ९८.३७ टक्के आहे.
तालुक्यातील विविध शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे- श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड (कला- ९२.५९, वाणिज्य- १००, व्यवसाय विभाग- ९७.२२), पिरंगुट इंग्लिश स्कूल (कला- ८९.२४, वाणिज्य- ९९.१८, विज्ञान- १००, व्यवसाय विभाग- ९५.०६), न्यू इंग्लिश स्कूल हिंजवडी (कला- ८८.८८, वाणिज्य- ९७.०५), माध्यमिक विद्यालय भूगाव (वाणिज्य- ९६.६६), राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा कासारआंबोली (विज्ञान- ९५.९१), बालाजी ज्युनिअर कॉलेज ताथवडे (विज्ञान- ९८.४७, वाणिज्य- ९८.८६), मारूंजी विद्यालय (वाणिज्य- ९४.७९, विज्ञान- १००), संपर्क विद्यालय भांबर्डे (वाणिज्य- ९३.३३), सूर्यदत्ता महाविद्यालय बावधन (कला- ९५.५५, वाणिज्य- ९४.६६, विज्ञान ९५.०४, व्यवसाय विभाग- १००), अनुसया ओव्हाळ विद्यालय माण (कला- ७०.३७, वाणिज्य- ७८.९४), माध्यमिक विद्यालय उरवडे (वाणिज्य- ८०.९५), चैतन्य ज्युनिअर कॉलेज नांदे (विज्ञान- १००), चाणक्य ज्युनिअर कॉलेज पिरंगुट (विज्ञान- १००), अकेमी ज्युनिअर कॉलेज (विज्ञान- १००, वाणिज्य- ९४.७३).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT