पुणे

‘मल्टी लेन फ्री फ्लो’चे गडकरींच्या हस्ते उद्‍घाटन

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली,ता.११  ः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राजधानी दिल्लीमध्ये आज अर्बन एक्स्टेंशन रोड-२ वर अडथळे नसलेल्या मुंडका-बक्करवाला मल्टी लेन फ्री फ्लो टोल प्रणालीचे उद्‍घाटन केले. महामार्गावर न थांबता टोल देण्याची सुविधा असलेला दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील सूरत-भरुचदरम्यानच्या चोरयासीपाठोपाठ देशातील हा दुसरा टोल प्लाझा ठरला आहे.

‘‘रस्त्यांवरील वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा प्रस्थापित करण्याच्या मालिकेत मल्टी लेन फ्री फ्लोच्या निर्मितीचे काम सोपे नव्हते. त्यात तंत्रज्ञान आणि उपकरणांचा दर्जाचेही  आव्हान होते. या तंत्रज्ञानामुळे टोल वसुलीसाठी होणारा १५ टक्के खर्च ४ टक्क्यांवर येणार आहे. शिवाय टोल चुकविण्याची सोय नसल्यामुळे आणखी आठ टक्के महसुलाची भर पडणार आहे. त्यामुळे  दरवर्षी १२ ते १५ हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे,’’ असे गडकरी यांनी सांगितले. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सप्टेंबर २०२६ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाना, तमीळनाडू, कर्नाटक, राजस्थान, आसाम या राज्यांमध्ये १७ बॅरियरमुक्त मल्टी लेन फ्री फ्लो टोल प्लाझा सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सेन्सर आणि कॅमेऱ्याच्या साह्याने फास्ट टॅगच्या माध्यमातून वाहनांची ओळख पटवून टोल वसूल करणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे न थांबता टोल भरण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि इंधनाची बचत होऊन वाहनांना रांगा लावण्याची गरज पडणार नाही. टोल चुकविणाऱ्या वाहनांना ई-नोटीस बजावण्यात येतील आणि ७२ तासांमध्ये टोल भरल्यास दंड भरावा लागणार नाही. ७२ तासांनंतर मात्र दुप्पट टोल आकारला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT