पुणे

वाऱ्याचा वेग मंदावल्याने हवा प्रदूषित

CD

मुंबईत वाऱ्याचा वेग
मंदावल्याने हवा प्रदूषित

फटाक्यांच्या उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यास मदत करणारे समुद्री वारे यंदा अपुरे ठरत असल्याने शहरातील हवा अधिक प्रदूषित होत आहे. मुंबईच्या दक्षिणेकडील अलिबागसह ग्रामीण भागांत उघड्यावर जाळला जाणारा कचरा आणि फटाक्यांमधून होणारे उत्सर्जन यामुळे प्रदूषणात भर पडण्याची भीती ‘आवाज फाउंडेशन’च्या सुमैरा अब्दुलअली यांनी व्यक्त केली आहे. २०२६ मध्ये दुसऱ्यांदा मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही खालावल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबईत वाऱ्यांचा वेग मंदावल्याने प्रदूषित हवा शहरातच साचून राहत आहे, अलिबाग आणि आसपासच्या ग्रामीण भागांत कचरा संकलन व विल्हेवाटीची पुरेशी व्यवस्था नसल्याने उघड्यावर कचरा जाळला जात असल्याचे अब्दुलअली यांनी निदर्शनास आणले. त्यांच्याकडील सेन्सरवरील मोजमापानुसार, रस्त्यालगत कचरा जाळला जात असताना पीएम २.५ या सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण १,००० पेक्षाही अधिक नोंदवले गेले, तर अलिबागमधील काही भागांत ते ३०० ते ४०० होते, या भागांत अधिकृत हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे नसल्याने प्रदूषणाची नियमित नोंद होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. फटाक्यांच्या चाचण्यांमध्ये विषारी जड धातू आढळल्याचा दावा करताना, ‘ग्रीन फटाके’ म्हणून विकल्या जाणाऱ्या काही फटाक्यांमध्येही असे घटक आढळल्याचे अब्दुलअली यांनी सांगितले. नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यास अशा फटाक्यांमुळेही प्रदूषणाचा धोका कायम राहतो, असे त्यांचे म्हणणे आहे. रस्ते आणि पदपथांवर फटाके फोडून न्यायालयीन निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Torrent Project: 'टोरंट'साठी बेसुमार वृक्षतोड! तब्बल ३२ हजार झाडे तोडणार; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल पुन्हा फेल! न्यूझीलंडच्या २०४ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ढेपाळले... Video

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस, ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम

Latest Marathi News Update : ‘मन की बात’ ऐकण्याची विद्यार्थिनींना सक्ती, गैरहजर राहिल्यास दंडाचा इशारा

Nana Patole Statement : २०२४ साली काँग्रेसचे ७५ तर महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडूण आले असते; आयबीच्या रिपोर्टमध्ये उल्लेख, नाना पटोलेंचा दावा

SCROLL FOR NEXT